Home Breaking News Chandrapur dist@ news आ.किशोर जोरगेवारांच्या मागणी नंतर जिल्हा क्रीडा संकुलासाठी लावण्यात...

Chandrapur dist@ news आ.किशोर जोरगेवारांच्या मागणी नंतर जिल्हा क्रीडा संकुलासाठी लावण्यात आलेले शुल्क रद्द होणार विधानसभेत मांडला होता प्रश्न, शुल्क आकारणीला स्थगिती देण्याचे क्रीडा मंत्र्यांचे आश्वासन

699

Chandrapur dist@ news

■ आ.किशोर जोरगेवारांच्या मागणी नंतर जिल्हा क्रीडा संकुलासाठी लावण्यात आलेले शुल्क रद्द होणार

■ विधानसभेत मांडला होता प्रश्न, शुल्क आकारणीला स्थगिती देण्याचे क्रीडा मंत्र्यांचे आश्वासन

सुवर्ण भारत:किरण घाटे(विशेष प्रतिनिधी)

चंद्रपुर:जिल्हा क्रीडा संकुल येथे पोलिस भरतीची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसह येथे फिरायला येणाऱ्या नागरिकांडून शुल्क आकारण्याचा घेण्यात आलेल्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी अधिवेशनात चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी केली. यावर उत्तर देतांना माहिती घेऊन आकारण्यात आललेले शुल्क रद्द करण्याचे आश्वासन क्रीडा मंत्री गिरीष महाजन यांनी दिले आहे.

दरम्यान या आधी जिल्हा क्रीडा संकुल येथे येणाऱ्यांकडून शुल्क घेण्याचा निर्णय क्रीडा संकुलच्या वतीने घेण्यात आला होता. याचा शहरात सर्वत्र विरोध होत असतांना आज आमदार जोरगेवार यांनी उपरोक्त प्रश्न नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात उपस्थित केला. यावेळी ते म्हणाले कि, चंद्रपूरला सिंथेटिक ट्रॅक हा शासनाच्या पैश्यांतुन तयार करण्यात आला आहे. सध्या पोलिस विभागासह ईतर विभागाच्या भरत्या सुरु आहे. अशातच जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी येथे येणा-या सरावासाठी येणाऱ्यांकडून खेळाडूंकरीता 500 रुपये आणि जनतेकरीता 300 रुपये असा मासिक शुल्क आकारलेला आहे.

हा शुल्क तात्काळ रद्द करावा अशी मागणी आमदार जोरगेवार यांनी अधिवेशनात धरुन लावली. यावर उत्तर देतांना क्रीडा मंत्री गिरीष महाजन यांनी सदरहु बाबतची माहिती घेऊन शुल्क आकारणीच्या निर्णयाला स्थगिती देण्याचे आश्वासन यावेळी दिले . त्यामुळे या क्रीडा संकुलात पोलिस भरतीचा सराव करत असलेल्या विद्यार्थ्यांसह येथे फिरायला जाणांऱ्या नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.