Home Breaking News Chandrapur dist@ news जूण्या पेन्शनसाठी पटवारी संघटना धडकली विधान भवनावर! ...

Chandrapur dist@ news जूण्या पेन्शनसाठी पटवारी संघटना धडकली विधान भवनावर! नागपूरात निघाला पटवारी व मंडळ अधिकारी वर्गांचा विराट मोर्चा !

285

Chandrapur dist@ news

■ जूण्या पेन्शनसाठी पटवारी संघटना धडकली विधान भवनावर!

■ नागपूरात निघाला पटवारी व मंडळ अधिकारी वर्गांचा विराट मोर्चा !

‌सुवर्ण भारत: किरण घाटे (विशेष प्रतिनिधी)

चंद्रपुर:सेवानिवृत्ती‌ नंतर वृध्दापकाळात जिवन जगणे फार कठीण आहे.कुटुंबाचा उदार निर्वाह कसा करावा हा प्रश्न सतत त्यांचे डोळ्यांसमोर तरंगत असतो.सेवानिवृत्त नंतर राज्यातील महसूल कर्मचारी वर्गांना पेंशन लागू करावी अशी त्यांची गेल्या काही वर्षांपासून रास्त मागणी आहे. तदवतचं जुणी पेंशन लागु करावी या मागणीसाठी अनेकदा त्यांनी आंदोलन उभारुन राज्य शासनाचे लक्ष केंद्रीत केले होते .परंतु अद्याप यश त्यांचे पदरात पडले नाही.

परत याच मागणीसाठी महसूल विभागातील पटवारी व मंडळ अधिकारी वर्गांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी काल मंगळवार दि.२७डिसेंबरला जोरदार घोषणा देत नागपूरात भव्य मोर्चा काढला होता. या मोर्चात चंद्रपूर जिल्ह्यातील पटवारी व मंडळ अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.