Home Breaking News Vardha district@ news आदर्श एकता सामाजिक संघटनेच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले...

Vardha district@ news आदर्श एकता सामाजिक संघटनेच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

94

Vardha district@ news

● आदर्श एकता सामाजिक संघटनेच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

सुवर्ण भारत:अर्पित वाहने
उपजिल्हा प्रतिनिधी, वर्धा

वर्धा:स्थानिक वर्धा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सोबतच आदर्श एकता सामाजिक संघटना वर्धा शाखेचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी आदर्श एकता सामाजिक संघटनेचे अध्यक्ष गौतम अशोकराव कुंभारे उपाध्यक्ष अमर काशिनाथ भोगे तसेच सचिव संदीप भगवान सरोदे व गणेश शेंडे पत्रकार देशोन्नती , प्रवीण खोब्रागडे,पंकज येसनकर ,पंकज कुंभारे विचारपीठावर उपस्थित होते. यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण करण्यात आला. “सावित्रीबाई फुले यांचे सामाजिक कार्य व आजच्या महिलांची भूमिका” या विषयावर प्रा.अमर भोगे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष गौतम कुंभारे यांनी सुद्धा सावित्रीबाईंच्या जीवनाचा आढावा उपस्थितः समोर ठेवला याच वेळी आदर्श एकता सामाजिक संघटना महाराष्ट्र वर्धा महिला शाखेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी भारती थुल यांची महिला शाखा संघटनेच्या अध्यक्षा म्हणून नियुक्ती करण्यात आली. तर सचिव म्हणून सौ अरुणा ओरके यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच अर्चना नगराळे (कोषाध्यक्ष) ,आशाताई कुशवाह (संघटक),जयमालाताई सोनगडे (प्रसिद्धीप्रमुख) रीना संजय नेमाडे (सदस्य) स्नेहा नगराळे (सदस्य) रंजनाताई रवींद्र बानोकर (सदस्य),सोनकाते काकू (सदस्य), वैष्णवी पोरचे (सदस्य) ,बबीता मेघे (सदस्य) इत्यादी पदाधिकाऱ्यांची आदर्श एकता सामाजिक संघटना महाराष्ट्र शाखा वर्धेच्या पदी नियुक्ती करण्यात आली. यावेळी वरील सर्व महिलांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सहकार्य केले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. Up