Home क्राईम Aarvi taluka @news आर्वी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार...

Aarvi taluka @news आर्वी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन.

96

Aarvi taluka @news

आर्वी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन.

सुवर्ण भारत:अर्पित वाहने
उपजिल्हा प्रतिनिधी, वर्धा

आर्वी:क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती, क्रांतीरत्न फातिमा बेग जयंती, जागतिक धम्मध्वज दिन राजमाता जिजाऊ व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नाम विस्तार दिनानिमित्त या संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन आंतरराष्ट्रीय धम्म जागृती युवा संघातर्फे व सुरेश भिवगडे मित्रपरिवारातर्फे
दिनांक १४ जानेवारी २०२३ ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर सिद्धार्थ बुद्ध विहार आर्वी येथे आंतरराष्ट्रीय धम्म जागृती युवा संघ व सुरेश भिवगडे मित्र परिवाराच्या वतीने करण्यात होते .

यामध्ये सकाळी १०.०० वाजता उपजिल्हा रुग्णालय आर्वी येथे फळ वाटप कार्यक्रम व सोबतच वृक्षारोपण कार्यक्रम व प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सर्वप्रथम उपजिल्हा रुग्णालय आर्वी येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला हारार्पण मान. वैद्यकीय अधीक्षक डॉ मोहनजी सुटे व रहुपालजी नाखले डॉ राहूल शेंडे सुरेश भिवगडे, दिपक ढोणे यांचे हस्ते करण्यात आले. दुसऱ्या सत्रात प्रबोधन व एकपात्री नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा प्रवीण कांबळे निळाई सामाजिक सांस्कृतिक परिवार नागपूर व राष्ट्रीय प्रवक्ते गगन मलिक फाऊंडेशन इंडिया होते कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून झुंड व जयंती व इतर काही मराठी चित्रपटात सहकलाकार म्हणून काम केलेले मायकेल जामगडे यांची विशेष उपस्थिती या कार्यक्रमा प्रसंगी होती.

तर प्रमुख पाहुणे प्रा डॉ विजयाताई मुळे मॅडम सुरेश वंजारी,नरेश पाटील, प्रा पंकज वाघमारे, यशोदाताई व्यंकटेश आत्राम धम्म प्रचारक मधुकर सवाळे, नंदा पाटील मॅडम, जलेंद्र मेश्राम डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती आर्वी अध्यक्ष पंकज भिमके सुरज मेहरे, सचिन मनवरे, हरिश कठाणे, रवी भिमके शुभांगी कुंभारे, अभिषेक भिवगडे विजय गजभिये शुभांगी भिवगडे संभाजी ब्रिगेडचे रोहन हिवाळे, टिपू सुलतान ग्रुपचे अबरार खान,आदी मान्यवर उपस्थित होते. प्रा प्रवीण कांबळे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढ्याचा संघर्षमय इतिहास सांगितला.

याप्रसंगी एकपात्री नाटकाचे आयोजन करण्यात आले होते यात मी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बोलतेय
एकपात्री नाटक सादरकर्ती अनुष्का ओमप्रकाश सोनोने
व संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेले एकपात्री नाटक शिल्पकार
सादरकर्ते नाटककार विलास थोरात अमरावती यांनी सादर केले. सौम्या सोनोने हिने सावित्रीमाई फुले यांच्या जीवनावर विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या सुरवातीला बुद्ध वंदना भंते करुणा किर्ती यांनी केली.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन धम्मप्रचारक सुरेश भिवगडे व प्रास्ताविक पायल पाटील व आभार रवि भीमके यांनी मानले. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे विविध चित्रपटांत भूमिका मायकल जामगडे होते

त्यांनी झूंड, जयंती, साथ तुझा भेटला, आम्ही बटर फ्लाय, झाली वूड तसेच वेब सिरीज मर्डर इन कोर्ट रूम व चुतीया यात काम केले आहे तर त्यांचे आगामी चित्रपट घर बंदूक बिर्याणी व लाल पहाड प्रदर्शित होणार आहे.

धम्मप्रचारक सुरेश भिवगडे यांचा १४ जानेवारी हा जन्म दिवस आर्वी शहरांतील बुद्ध विहार समिती व महिला मंडळ व मित्र परिवारातर्फे साजरा करण्यात आला.या कार्यक्रमासाठी प्रांजली आत्राम , प्रज्ञा कठाणे, प्रिया नारे,
स्वप्नील फुलोके, भारत न्युजचे शिरीष काळबांडे, प्रशांत हेरोडे,
अभिषेक भिवगडे, आकाश वाघमारे, योगेश बावणे, अनिकेत भगत, नयन गायकवाड, नितेश बनसोड, विजय खडतकर, तक्षशिला बुद्धविहार संजय नगर महिला मंडळ व महाप्रजापती गौतमी महिला मंडळ वाल्मीकी वॉर्ड व उपासक उपासिका उपस्थित होते. आदी सहकार्य केले.