Home Breaking News Ballarpur city rashatvadi congress parti@news बल्लारपूर राष्ट्रवादी युवक कांग्रेस अमर धोंगडे...

Ballarpur city rashatvadi congress parti@news बल्लारपूर राष्ट्रवादी युवक कांग्रेस अमर धोंगडे शहर अध्यक्ष तर अजित पडवेकर शहर उपाध्यक्ष पदावर नियुक्ती

663

Ballarpur city rashatvadi congress parti@news

● बल्लारपूर राष्ट्रवादी युवक कांग्रेस अमर धोंगडे शहर अध्यक्ष तर अजित पडवेकर शहर उपाध्यक्ष पदावर नियुक्ती

सुवर्ण भारत:ताहीर शेख
विशेष जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपुर

बल्लारपुर:नुकतेच समाजीक पक्षाच्या युवा कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश घेतला. चंद्रपूर जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, व महिला जिल्हाध्यक्ष बेबी उईके यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि चंद्रपूर युवक जिल्हाध्यक्ष इंजि. राकेश सोमाणी यांच्या पुढाकाराने सामाजिक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

राष्ट्रवादी काँग्रेस हा जनतेचे दुःख जाणणारा पक्ष आहे, त्यामुळे चंद्रपुर जिल्ह्यात कुठल्याही भागात मदत देण्यासाठी सर्वप्रथम राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पोहोचतात, शासनाच्या विविध लोकोपयोगी योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी चंद्रपूर जिल्हा येथील कार्यकर्ते नेहमी तत्पर असतात.

हेच काम बघता अमर धोंगडे आणि अजित पडवेकर व त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा मध्ये प्रवेश केला, व अमर धोंगडे यांना बल्लारपूर शहर युवक अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आले तर अजित पडवेकर यांना उपाध्यक्ष पदी नियुक्त करण्यात आले.

पक्ष प्रवेशाचा कार्यक्रमात बल्लारपूर शहर अध्यक्ष बादल उराडे, महिला शहर अध्यक्ष मलेश्वरी महेशकर,बल्लारपूर विधानसभा महिला अध्यक्ष शुभांगी साठे,व्यापारी शहर अध्यक्ष कौशल तिलोकांनी,गोपाल कडेल,शाबीर भाई कुरेशी, राजू काब्रा, इब्राहिम खान, सुमित (गोलू डोहणे),अंकीत निवलकर,अमर रहीकवार,बबलू पठाण, लालू काब्रा व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.