Home Breaking News Chandrapur city @news प्रियदर्शिनी इंदिरा गांधी स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने प्रियदर्शिनी इंदिरा...

Chandrapur city @news प्रियदर्शिनी इंदिरा गांधी स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने प्रियदर्शिनी इंदिरा गांधी स्मृती विशेष सेवा पुरस्कार वितरण सोहळा.

141

Chandrapur city @news

■ प्रियदर्शिनी इंदिरा गांधी स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने प्रियदर्शिनी इंदिरा गांधी स्मृती विशेष सेवा पुरस्कार वितरण सोहळा.

सुवर्ण भारत:ग्यानिवंत गेडाम
सहजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपुर

चंद्रपुर:प्रियदर्शिनी इंदिरा गांधी स्मृती प्रतिष्ठान चंद्रपूरच्या वतीने प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी खासदार नरेशबाबू पुगलिया यांच्या पुढाकाराने सामाजिक तथा सांस्कृकि क्षेत्रात सामाजिक बांधिलकी जोपासणा-या व सामाजिक दायित्वाची जाणीव ठेवून समाजाला तथा प्राणी मात्रांना विशेष सेवा देणा-या श्री उज्जवल गौरक्षण संस्था, (लोहारा ) चंद्रपूर,यांना प्रियदर्शिनी इंदिरा गांधी स्मृती विशेष सेवा पुरस्काराने गौरविण्यात येत आहे. या पुरस्काराचे स्वरूप १ लाख ११ हजार १११ रुपये व सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे आहे.

सदर पुरस्कार सोहळा भारतीय प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारी २०२३ ला सकाळी ८ वाजून १५ मि. राष्ट्रमाता इंदिरा गांधी यांच्या पूर्णाकृती परिसरात प्रियदर्शिनी चौक चंद्रपूर येथे होणार आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कॉंग्रेसचे नेते तथा माजी खासदार नरेशबाबू पुगलिया हे राहणार असून याप्रसंगी वन मंत्री तथा चंद्रपूर जिल्हायाचे पालकमंत्री ना. सुधिर मुनगंटीवार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार व यांच्या शुभहस्ते श्री. उज्जवल गौरक्षण संस्था, (लोहारा ) चंद्रपूर यांना प्रियदर्शिनी इंदिरा गांधी स्मृती विशेष सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.