Home Breaking News Ghuggus city@ news घुग्घुस शहरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती भव्य पुतळ्याचा...

Ghuggus city@ news घुग्घुस शहरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती भव्य पुतळ्याचा अनावरण सोहळा.

314

Ghuggus city@ news

■ घुग्घुस शहरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती भव्य पुतळ्याचा अनावरण सोहळा.

सुवर्ण भारत:पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपुर

चंद्रपूर जिल्हाच नव्हे तर विदर्भ आणि महाराष्ट्र भर दूरवर औधोगिक नगरी म्हणून प्रसिध्द आणि देशाच्या औधोगिक प्रगतीत गेले अनेक वर्षापासून महत्वाची भूमिका बजावत असलेल्या घुग्घुस येथे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पुतळा लोकसहभागातून शहराच्या मध्यभागी उभारण्याचा संकल्प घुग्घूस येथील नवबौध्द स्मारक तथा बहुउद्देशिय समितीने बरेच वर्षापूर्वी केला होता. पुतळा तहसील कार्यालयाजवळ पटांगणावर उभारण्याचे ठरले. ही जागा पुतळयाकरीता मिळविण्याकरीता अनेक मान्यवरांनी भरपूर सहकार्य केले आणि अखेर स्वप्नपूर्ती होऊन हा पूतळा नियोजित ठिकाणी बसविण्यात आला आहे.
९ फुट उंचीचा घुग्घूस शहरातील सर्वात उंच आणि भव्य हा पूतळा घुग्घूस शहराच्या वैभवात भर टाकणारा आहे. आणि प्रेरणा देणारा ही ! या भव्य पुतळयाचे अनावरण प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारी २०२३ ला दुपारी ३.०० वाजता होणार असून या देखण्या सोहळ्यात कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी खासदार नरेशबाबू पुगलिया तर नागपूर दिक्षाभूमीचे अध्यक्ष प. पु. भंते नागार्जुन ससाई यांच्या शुभहस्ते तसेच प्रमुख अतिथी वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री.ना. सुधिर मुनगंटीवार व विशेष अतिथी चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर माजी खासदार हंसराज अहिर, चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार, भद्रावतीचे आमदार सौ. प्रतिभाताई धानोरकर,आर. पी. आय चे अध्यक्ष बाळू खोब्रागडे हे उपस्थित राहणार आहे.
अनावरण सोहळा नंतर दुय्यम कव्वालीचा आनंद घ्यावा.असे स्नेह निमंत्रण कार्यक्रमाचे संयोजक राहुलबाबू पुगलिया व नवबौध्द स्मारक तथा बहुउद्देशिय समितीचे अध्यक्ष रामचंद्र चंदनखेडे यानी केले