Chandrapur city@ news
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ७५ व्या स्मृति दिनानिमित्य विदर्भ किसान मजदूर कॉंग्रेस तर्फे श्रध्दांजली वाहीली
सुवर्ण भारत:ग्यानिवंत गेडाम
उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपुर
चंद्रपूर (दिनांक 30 जानेवारी 2023)
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मृती दिनी आज दिनांक 30 जानेवारी 2023 रोजी सकाळी 10. 30 वाजता विदर्भ किसान मजदूर काँग्रेस शहर व जिल्हा चंद्रपूरच्या वतीने काँग्रेसचे नेते तथा माजी खासदार नरेशबाबू पुगलिया यांच्या सुयोग्य मार्गदर्शनात चंद्रपूर येथील स्थानिय गांधी चौकातील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळयाला महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे माजी महासचिव तथा कॉंग्रेसचे युवा नेते राहुलबाबू पुगलिया यांच्या प्रमुख उपस्थित श्रदांजली कार्यक्रम घेण्यात आला.
भारतीयांना राष्ट्रसेवेसाठी प्रेरणा देणारे व जगाला अहिंसा आणि शांतीचा संदेश देणा-या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज 75 वी पुण्यतिथी निमित्य राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळयाला कॉंग्रेसचे युवा नेते राहुलबाबू पुगलिया यांनी मालार्पण करून श्रध्दांजली वाहीली. तसेच विदर्भ किसान मजदूर कॉंग्रेसचे, युवक कॉंग्रेसचे व कॉंग्रेसच्या सर्व फंटल ऑर्गनायझेशनच्या वतीने गांधीजींना पुष्पहार वाहून सामूहिक सलामी देण्यात आली. व दोन मिनिटे मौन श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
तसेच कॉंग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यानी ‘अमर रहे अमर रहे… महात्मा गांधीजी अमर रहे’ असा जयघोष केला.
याप्रसंगी सर्वश्री विदर्भ किसान मजदूर कॉंग्रेसचे, शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक देवेंद्र बेले. महासचिव अशोक नागापुरे, स्वप्नील तिवारी, दुर्गेश चौबे, सुधाकरसिंह गौर, चेतन गेडाम, सुभाष माथनकर, रतन शिलावार, शंकर महाकाली, पृथ्वी जंगम, अजय महाडोळे, अनंत हुड, सुनिल बावणे, बाबूलाल करुणाकर, सुदर्शन पुली, किष्णा कौरासे, कृष्णा यादव, शंभरकर, मो. फरीद व शेकडो कॉंग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.