Home चंद्रपूर Ballarpur city@ news युवक कांग्रेस व एन.एस.यु.आई तर्फे एस.बी.आय, एल.आय.सी कार्यालया...

Ballarpur city@ news युवक कांग्रेस व एन.एस.यु.आई तर्फे एस.बी.आय, एल.आय.सी कार्यालया समोर आंदोलन.

336

Ballarpur city@ news

■ युवक कांग्रेस व एन.एस.यु.आई तर्फे एस.बी.आय, एल.आय.सी कार्यालया समोर आंदोलन.

सुवर्ण भारत:ताहीर शेख
उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपुर

बल्लारपुर :-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्योगपती मित्र गौतम अदानी यांच्या उद्योग समुहात एसबीआय, एलआयसी व इतर सरकारी वित्तिय संस्थांचा पैसा नियम डावलून गुंतवला.

अदानी समुहातील ही गुंतवणूक आता धोक्यात आली असून जनतेचा पैसा बुडण्याची भिती निर्माण झाली आहे.

हा पैसा सुरक्षित रहावा व अदानीच्या गैरकारभाराची चौकशी करावी या मागणीसाठी माजी खा.नरेशबाबू पुगलिया यांच्या मार्गदर्शनाथ व राहुल पुगलिया,करण पुगलिया यांच्या नेतृत्वा युवक कांग्रेस प्रदेश सहसचिव चेतन गेडाम यांनी युवक कांग्रेस,एन.एस.यु.आई च्या वतीने सोमवारी ६ फेब्रुवारीला बल्लारपुर शहराच्या एस.बी.आय व एल.आय.सी च्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

आंदोलनात पुरोगामी पत्रकार संघटनेचे जिल्हा सलाहकार नाना बुंदेल,शंकर महाकाली,अरबाज़ सिद्दीकी,अजय रेड्डी, प्रीतम पाटणकर,दानिश शेख,सुनील मोतीलाल,जिशान सिद्दीकी, सोहिल खान, विकास श्रीवास,विककी गुजरकर, अक्षय गोड़मारे,रोशन ढेगड़े,अज़हर शेख,राजा केशकर, बब्लू प्रसाद, सूरज गेडाम, रोहिल खन्ना, रूपेश भोयर, सुमित ढेठे,शशि कोटवार, रोहिन सक्सेना, राजेश केसकर, कुशल वर्मा,निखिल वाड़के युवक काँग्रेस व एन.एस.यु.आई सर्व नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अदानीच्या गैरकारभाराचा भांडाफोड झाला असून तब्बल ७ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. हा पैसा अदानीचा नसून जनतेचा आहे असे असतानाही मोदी सरकार मौन बाळगून आहे.

संसदेत विरोधक चर्चा करण्याची मागणी करत आहेत परंतु सरकार चर्चेपासून पळ काढत आहे.

म्हणून युवक कांग्रेस व एन. एस. यू.आई तर्फे धरना प्रदर्शन करण्यात आले