Home Breaking News @Vidharbh news वेगळ्या विदर्भासाठी निघणार ‘विदर्भ निर्माण यात्रा’, सिंदखेडराजामधून होणार प्रारंभ

@Vidharbh news वेगळ्या विदर्भासाठी निघणार ‘विदर्भ निर्माण यात्रा’, सिंदखेडराजामधून होणार प्रारंभ

413

@Vidharbh news

वेगळ्या विदर्भासाठी निघणार ‘विदर्भ निर्माण यात्रा’, सिंदखेडराजामधून होणार प्रारंभ

विदर्भ : वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावरुन पुन्हा एकदा विदर्भ राज्य आंदोलन समिती आक्रमक झाली आहे. वेगळ्या विदर्भासाठी ‘विदर्भ निर्माण यात्रा’ निघणार आहे. विदर्भ राज्य आंदोलन समिती ही यात्रा काढणार असून, येत्या 21 फेब्रुवारीपासून या यात्रेला प्रारंभ होणार आहे. पश्चिम विदर्भातून बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजामधून या यात्रेची सुरुवात होणार असल्याची माहिती विदर्भ राज्य आंदोलन समितीचे प्रमुख माजी आमदार वामनराव चटप यांनी दिली.

विदर्भ निर्माण यात्रा ही पश्चिम विदर्भातून बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा मधून निघणार आहे. तर पूर्व विदर्भातून सिरोंचा येथून ही यात्रा नागपूरकडे निघणार आहे. दरम्यान, वेगळ्या विदर्भासाठी आता विदर्भ राज्य आंदोलन समिती आक्रमक होताना दिसत आहे. वेगळा विदर्भ करण्याचा विषय कायम निकाली काढण्याचा निर्णय आम्ही घेतला असल्याचे चटप म्हणाले.