Home Breaking News @ Delhi news अर्थसंकल्पाचे फायदे लोकांपर्यंत पोहोचवा- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खासदारांना...

@ Delhi news अर्थसंकल्पाचे फायदे लोकांपर्यंत पोहोचवा- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खासदारांना आवाहन

384

@ Delhi news
● अर्थसंकल्पाचे फायदे लोकांपर्यंत पोहोचवा- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खासदारांना आवाहन

नवी दिल्ली-आगामी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपच्या नेत्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत दिलेला कानमंत्र मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदीय पक्षाच्या बैठकीत खासदारांना दिला. यंदाचा अर्थसंकल्प सर्वसमावेशक असून समाजातील प्रत्येकाला त्यातून लाभ मिळेल. ही बाब खासदारांनी लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

लोकप्रतिनिधींनी लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे व केंद्र सरकारच्या लोकाभिमुख निर्णयांची व योजनांची माहिती दिली पाहिजे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. अर्थसंकल्पामध्ये समाजातील सर्व घटकांसाठी तरतूद करण्यात आली आहे, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

तुर्कस्तान व सीरियामध्ये तीव्र भूकंपांमुळे झालेल्या जीवितहानीबद्दल बोलताना मोदींनी गुजरातमधील भूकंपाचा अनुभव सांगितला. भूकंपामुळे गुजरातचे अतोनात नुकसान झाले. त्यातून बाहेर पडून पुन्हा गुजरातने स्वत:ला घडवले; पण त्यासाठी कित्येक वर्षे कष्ट सोसावे लागले. तुर्कस्तान व सीरियातील नागरिक कुठल्या संकटाला सामोरे जात आहेत, हे समजू शकतो. या देशांना भारताने तातडीने मदत पाठवली आहे, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.