Home Breaking News Mul city@ news राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने उद्या मूल नगरीत जनजागरण...

Mul city@ news राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने उद्या मूल नगरीत जनजागरण सभेचे आयोजन ! कार्यकर्त्यांनी बहुसंख्येंने उपस्थित राहावे:अर्चना चावरेंचे आवाहन !

186

Mul city@ news

■ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने उद्या मूल नगरीत जनजागरण सभेचे आयोजन !

■ कार्यकर्त्यांनी बहुसंख्येंने उपस्थित राहावे:अर्चना चावरेंचे आवाहन !

सुवर्ण भारत:किरण घाटे
विशेष प्रतिनिधी

मूल: मूल शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने उद्या मंगळवार दि. 14 फेब्रुवारीला सायंकाळी 6वाजता जन जागरण यात्रा सभेचे आयोजन करण्यात आले आहे .

आयोजित सभेला महाराष्ट्र प्रदेश महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा विद्याताई चव्हाण, माजी राज्यमंत्री प्राजक्त दादा तनपूरे राज्य महिला प्रभारी सुरेखा ठाकरे, विभागीय अध्यक्ष शाहीनी हकीम , युवती अध्यक्ष प्रज्ञा पाटील, चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष राजेंद्र वैद्य, जिल्हा महिला अध्यक्ष बेबीताई उईके मोलाचे मार्गदर्शन करणार आहे.

सदरहु कार्यक्रमाला बल्लारपूर विधानसभेचे अध्यक्ष, मूल तालुका अध्यक्ष, मूल तालुका महिला अध्यक्ष, मूल शहर अध्यक्ष, मूल युवक अध्यक्ष , सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्थानिक गांधी चौक मूल येथे उपस्थित राहावे असे आवाहन मूल महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शहराध्यक्ष अर्चना मार्कंडी चावरे यांनी एका प्रसिध्दी पत्रकातून केले आहे.