Home Breaking News Nagpur dist@news राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे येत्या १५ मार्चला मंत्रालयासमोर मुंबईत निदर्शने ...

Nagpur dist@news राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे येत्या १५ मार्चला मंत्रालयासमोर मुंबईत निदर्शने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात राज्यस्तरीय अधिवेशन

242

Nagpur dist@news
■ राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे येत्या १५ मार्चला मंत्रालयासमोर मुंबईत निदर्शने

■ यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात राज्यस्तरीय अधिवेशन

सुवर्ण भारत:किरण घाटे
विशेष प्रतिनिधि

नागपूर, दि.२२ : ओबीसी लोकांच्या राज्य सरकारशी निगडीत विविध संवैधानिक मागण्यांना घेवून येत्या १५ मार्च रोजी मुंबईत मंत्रालयासमोर सकाळी ११ वाजता तीव्र निदर्शने आंदोलन करण्यात येणार आहे. हे निदर्शने आंदोलन आटोपल्यानंतर लगेच दुपारी २ वाजता राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राज्यस्तरीय अधिवेशन मंत्रालयासमोरील यशवंतराव चव्हाण प्रतिष्टान सभागृहात होणार आहे.
राष्ट्रीय ओबीसी महासंघ सन २०१६ पासून सतत आपल्या संवैधानिक मागण्यांच्या पूर्ततेसाठी केंद्र आणि विविध राज्य सरकारकडे निदर्शने, आंदोलने आणि मोर्चे तसेच देश व राज्यपातळीवरील अधिवेशने यांच्या द्वारे महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ .बबनराव तायवाडे यांच्या मार्गदर्शनात आणि नेतृत्वात घेत आले आहेत. परंतु काही मोजक्या मागण्या सोडल्यातर ओबीसी लोकांचा बहुतांश सैवैधानिक मागण्या या अद्यापही केंद्र आणि विविध राज्य सरकारांकडे प्रलंबित आहेत. या निदर्शने आंदोलनात आणि राज्यस्तरीय अधिवेशनात खालील मागण्या मंजूर करण्यासाठी राज्य सरकारवर दवाव आणण्यात येणार असल्याचेही डॉ. भांगरथ यांनी सांगितले .

ओबीसी लोकांच्या विविध मागण्यामध्ये – बिहार राज्याच्या धरतीवर महाराष्ट्र राज्यातही जातनिहाय जनगणना त्वरित करण्यात यावी, राज्यात इतर राज्याप्रमाणे जुनी पेंशन योजना त्वरित लागू करण्यात यावी, मराठा समाजाचा समावेश ओबीसी संवर्गात करण्यात येऊ नये, म्हाडा मार्फत बांधून देण्यात येणारी घरकुल योजना ओबीसी संवर्गासाठी त्वरित लागू करण्यात यावी, ओबीसी संवर्गातील विद्यार्थ्यांना विदेशातील उच्च शिक्षणाकरिता शिष्यवृत्ती योजनेस पात्र ठरविण्याकरिता लावण्यात आलेली ८ लाख रुपये उत्पन्न मर्यादा रद्द करून नॅान क्रमिलेअर प्रमाणपत्र असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना पात्र ठरविण्यात यावे, गुणवंत मुला-मुलींना परदेशातील उच्च शिक्षणासाठी देण्यात येणारी शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांची संख्या ५० वरून वाढवून ती १०० विद्यार्थी इतकी करण्यात यावी, ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतीगृहे त्वरित सुरु करण्यात यावे, एससी व एसटी विद्यार्थ्यांना लागू असलेली भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना ही सर्व ओबीसी विद्यार्थ्यांना त्वरित लागू करण्यात यावी, खुल्या प्रवर्गातील कर्मचा-र्यांची सेवाजेष्टता यादीनुसार पदोन्नती करीत असतांना सेवाजेष्टता यादीत असलेल्या ओबीसी संवर्गातील कर्मचा-र्यांना डावलले जाणारा अन्याय दूर करण्यात यावा तसेच सेवाजेष्टतेनुसार ओबीसी संवर्गातील कर्मचा-र्यांना खुल्या प्रवर्गातून पदोन्नती देण्यात यावी, महाज्योती या संस्थेकरिता एक हजार कोटी रुपयाची तरतूद लवकरात लवकर करून ही योजना कार्यान्विंत करण्यात यावी व महाज्योती तर्फे इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्रे राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी सुरु करण्यात यावे, सामाजिक न्याय विभागातील परिपत्रकानुसार ही प्रशिक्षण केंद्रे इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील संस्था चालकांनाच चालविण्यास देण्यात यावी, ओबीसी आर्थिक विकास महामंडळाला एक हजार कोटी रुपयाची तरतूद करण्यात यावी व या महामंडळाच्या सर्व योजना त्वरित सुरु करण्यात याव्यात, इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील रिक्त पदांचा अनुशेष त्वरित भरण्यात यावा, इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील शेतकरी, शेतमजुरांना वयाच्या ६० व्या वर्षानंतर पेंशन योजना लागू करण्यात यावी, बारा बलुतेदारांच्या आर्थिक विकासासाठी राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या नावाने स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून भरीव आर्थिक तरतूद करण्यात यावी, एससी,एसटी प्रवर्गाप्रमाणे इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील शेतक-र्यांना १०० टक्के सवलतीवर राज्यात योजना राबविण्यात यावी, एससी-एसटी प्रमाणे इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील विद्यार्थांसाठी सर्व अभ्यासक्रमांना १०० टक्के शिष्यवृत्ती लागू करण्यात यावी, महात्मा फुले समग्र वाङ्मय १० रुपये किमतीत उपलब्ध करून देण्यात यावे, इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील विद्यार्थांसाठी प्रत्येक शहरात व तालुक्याच्या ठिकाणी स्वतंत्र वाचनालयाची सोय उपलब्ध करून देण्यात यावी, महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यात ओबीसी विभागाचे कार्यालय सुरु करण्यात यावे, खाजगी उधोगधंदा व सरकारी उपक्रमात इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील युवकांना आरक्षण लागू करण्यात यावे, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाची अमंलबजावणीत या कार्यक्रमाअंतर्गत इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील लोकांचा समावेश करण्यात यावा, लोकभाषा विद्यापीठाची राज्यात स्थापना करण्यात यावी, महाराष्ट्र लोकसेवा आयोगावर सदस्य म्हणून ओबीसी प्रवर्गातील व्यक्तीस प्रतिनिधित्व देण्यात यावे अशा अनेक मागण्यांना घेवून हे ओबीसी लोकांचे निदर्शने आंदोलन व अधिवेशन राज्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशानादरम्यान मंत्रालयासमोर मुंबईत येत्या १५ मार्च रोजी घेण्यात येत आहे. या अधिवेशनात राज्यातील अनेक प्रभावी ओबीसी नेते उपस्थित राहणार असल्याचेही ते म्हणाले. डॉ.बबनराव तायवाडे यांच्या मार्गदर्शनात प्रमुख उपस्थित हे आंदोलन व अधिवेशन होणार आहे.
या अधिवेशनाची तयारी महाराष्ट्र राज्यातील गावागावातून जोमाने सुरु झाली असून राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर, समन्वयक डॉ. अशोक जिवतोडे, उपाध्यक्ष प्रा.शेषराव येलेकर, प्रा.सुधाकर जाधवर व अॅड.रमेशचंद्र घोलप, सहसचिव प्रा .शरद वानखेडे, कोश्याध्यक्ष गुणेश्वर आरीकर , राष्ट्रीय प्रवक्ते रूषब राऊत, प्रदेश कार्याध्यक्ष दिनेश चोखारे, विदर्भ प्रदेशाध्यक्ष शकील पटेल, मराठवाडा प्रदेश अध्यक्ष ब्राम्हजी केंद्रे, कोकण प्रदेश अध्यक्ष एकनाथ तरमळे, सल्लागार माजी आमदार दिगंबर विशे,उत्तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष भटू चौधरी, राज्य उपाध्यक्ष अनंत भारसाकळे, चंद्रकांत हिंगे, संघटक आशिष तायवाडे, कैलाश चौधरी, नागपूर शहर अध्यक्ष परमेश्वर राऊत, महिला आघाडीच्या अध्यक्षा इंजि. सुषमा भड, कार्याध्यक्ष अॅड. रेखा बारहाते, प्रदेशाध्यक्ष कल्पना मानकर,नागपूर शहर अध्यक्षा वृंदा ठाकरे,प्रदेश महासचिव प्रा.डॉ.अपर्णा पाटील, महिला कर्मचारी-अधिकारी आघाडीच्या अध्यक्ष रजनी मोरे, महासचिव पोर्णिमा मेहरकुरे, वकील महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अॅड.पुरुषोत्तम पाटील, सल्लागार अॅड.फिरदोस मिर्झा, महासचिव अॅड किशोर लांबट, किसान आघाडीचे अध्यक्ष प्रकश साबळे, युवा आघाडीचे अध्यक्ष सुभाष घाटे, राष्ट्रीय ओवीसी महासंघाचे प्रदेश महासचिव राजेश काकडे, ओबीसी कर्मचारी-अधिकारी महासंघाचे अध्यक्ष शाम लेडे, महासचिव अनिल नाचपल्ले, प्रदेश युवो आघाडीचे अध्यक्ष चेतन शिंदे, महासचिव संदिप आढाव, विद्यार्थी आघाडीचे नागपूर जिल्हा अध्यक्ष निलेश कोढे, शहराध्यक्ष विनोद हजारे, महासंघाचे संघटक बबनराव फंड, प्रसिद्धी प्रमुख विनोद उलीपवार, उज्ज्वला महल्ले, डिम्पल महल्ले, राहुल निमजे, श्वेता बोकडे, श्रेयश पडोळे, शुभम वाघमारे, पराग वानखेडे श्रवण विसेन यांच्यासह अनेक पदादिकारी व कार्यकर्ते उत्साहाने कामला लागले आहेत.