Home Breaking News Chandrapur dist@ news क्रीडा महोत्सवाच्या निमित्ताने चंद्रपूरात रंगतेय कुस्तीचे थरारक सामने !...

Chandrapur dist@ news क्रीडा महोत्सवाच्या निमित्ताने चंद्रपूरात रंगतेय कुस्तीचे थरारक सामने ! स्पर्धा बघण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी !

122

Chandrapur dist@ news

■ क्रीडा महोत्सवाच्या निमित्ताने चंद्रपूरात रंगतेय कुस्तीचे थरारक सामने !

■ स्पर्धा बघण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी !

सुवर्ण भारत:किरण घाटे(सहसंपादक)

चंद्रपुर:चंद्रपूर शहरातील श्री. माता महाकाली क्रीडा महोत्सव निमित्ताने स्थानिक महानगर पालिकेच्या प्रागंणात आयोजित राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत कुस्तीचा थरार नागरिकांना प्रत्यक्ष अनुभवयास मिळत आहे. या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय कुस्तीपटूंनी सहभाग घेतला आहे. दरम्यान खुटाळा येथे आयोजित हॅंन्डबॉल स्पर्धा पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने चंद्रपूरात आयोजित श्री माता महाकाली क्रीडा महोत्सवा अंतर्गत विविध १० ठिकाणी २१ प्रकारच्या खेळांना सुरुवात झाली आहे. काल सायंकाळी आमदार जोरगेवार यांनी महापालीका प्रागंणात आयोजित राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन केले. त्यानंतर सदरहु सामन्यांना सुरुवात झाली आहे. या सामन्यांमधील कुस्तीचे डावपेच पाहण्यासाठी प्रेक्षकांची मोठ्या संख्येने गर्दी होत आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कुस्तीपटूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यामुळे या सामन्यांमध्ये एक वेगळीच रंगत भरली आहे. जिल्ह्यात प्रथमच आयोजित राज्यस्तरीय हॅन्डबॉल स्पर्धा पाहण्यासाठी नागरिक गर्दी करीत आहे. खुटाळा येथे हे सामने होत आहे. या स्पर्धेत मुंबई, नाशीकसह राज्यभरातील संघानी सहभाग घेतला आहे. आज सकाळी योग आसन प्रतियोगितेचे आमदार जोरगेवार यांच्या हस्ते उद्घाटन झाले .जिल्हा क्रिडा संकुल येथील बॅंडमिंटन स्पर्धेचेही आमदार जोरगेवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे. घुग्घूस येथे क्रिकेट सामन्यांनाही सुरुवात झाली असुन येथे नांमाकीत १६ संघानी सहभाग घेतला आहे. रय्यतवारी येथील सिआरसी मैदानात सुरु असलेल्या राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेचा आज तिसरा दिवस असुन येथे राज्यभरातील संघानी सहभाग घेतला आहे. शुक्रवारी सकाळी ६ वाजता वरोरा नाका येथे स्केटींग स्पर्धा घेण्यात आली. यावेळी आमदार जोरगेवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. चंद्रपूरात आयोजित करण्यात आलेला हा क्रीडा महोत्सव क्रीडा प्रेमींसाठी एक प्रकारची मेजवानी ठरत आहे.

आ. अभिजीत वंजारी यांनी दिली श्री माता महाकाली क्रीडा महोत्सवाला भेट नागपूर पदविधर मतदार संघाचे आमदार अभिजीत वंजारी यांनी आज शुक्रवारी क्रीडा महोत्सवाला भेट देत महापालीका प्रांगणावर सुरु असलेल्या कुस्ती सामन्यांचा आनंद घेतला. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी शाल, श्रीफळ, माता महाकालीची मूर्ती देऊन त्यांचे स्वागत केले. आ. जोरगेवार यांनी आयोजित केलेला हा श्री माता महाकाली क्रीडा महोत्सव खेळाडूंसाठी संधी उपलब्ध करून देणार आहे. यातून नावोदित स्थानिक खेळाडूंना खेळातील बारिकी शिकायला मिळणार असल्याचे यावेळी ते म्हणाले. तसेच या क्रीडा महोत्सवाला आणि खेळाडूंना त्यांनी शुभेच्छा दिल्यात. यावेळी माजी नगरसेवक नंदु नागरकर, आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धक भाग्यश्री फंड, प्रतिक शिवणकर, बाळू कातकर यांच्यासह अन्य मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.