Nagpur city@ news
■ नागपूरात थाटात पार पडलेल्या एका कार्यक्रमात गडचिरोलीच्या अधिवक्ता कविता मोहरकर सन्मानित!
■ कार्यक्रमाला सिने अभिनेत्री सुधा चंद्रन यांची उपस्थिती!
सुवर्ण भारत:किरण घाटे(सहसंपादक)
नागपुर: विदर्भात अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोलीच्या सुपरिचित अधिवक्ता कविता मोहरकर यांना नागपूरात थाटात पार पडलेल्या एका कार्यक्रमात फिल्म सृष्टीतील सिने अभिनेत्री सुधा चंद्रन व हास्य अभिनेता राकेश बेदी यांचे हस्ते पुरस्कृत करण्यात आले.दरम्यान उपराजधानीत डॉ.वर्तिका पाटील ॲकडमीच्या वतीने काॅन्फिडन्स समिटचे आयोजन करण्यात आले होते.
आयोजित समारंभाला डॉ.विवेक नानोटी , डॉ.सुधिर भावे , डॉ.प्रयाग सिंगल, डॉ.प्रमोद गिरी , डॉ.राज गजभिये, डॉ.रुता धर्माधिकारी,डाॅ.महेश चोपडे व अन्य मान्यवर मंडळी उपस्थित होती. अधिवक्ता कविता मोहरकर यांचे आज पावेतो सामाजिक व कला क्षेत्रात मोलाचे योगदान राहिले असून त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतः सोबत गावाचे नाव रोशन केले आहे.या पूर्वी सुद्धा अधिवक्ता कविता मोहरकर यांना अनेक पुरस्कार बहाल झाले आहे.हे येथे उल्लेखनीय आहे.
