Home Breaking News Chandrapur dist@ news तरुणी व महिला रमल्या आठवणीच्या गावात ! ...

Chandrapur dist@ news तरुणी व महिला रमल्या आठवणीच्या गावात ! चंद्रपूरात पारंपरिक खेळांचे आयोजन; उपक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

115

Chandrapur dist@ news

■ तरुणी व महिला रमल्या आठवणीच्या गावात !

■ चंद्रपूरात पारंपरिक खेळांचे आयोजन; उपक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

सुवर्ण भारत:किरण घाटे(सह संपादक)

चंद्रपुर: श्री. माता महाकाली क्रीडा महोत्सवा निमित्ताने चंद्रपूरचे आ. किशोर जोरगेवार यांच्या वतीने आझाद बागेत चला आठवणीच्या गावात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत महिलांसाठी 17 जुने पारंपारिक खेळ घेतल्या गेले. बालपणीच्या या खेळांमध्ये शहरातील महिला व तरुणी चांगल्याच रमल्या ! दरम्यान चंद्रपूरातील तिन हजार महिलांनी या खेळात आपला सहभाग नोंदविला होता.

कार्यक्रमाला आ. किशोर जोरगेवार, कल्याणी जोरगेवार, भावना पालीवाल, डॉक्टर नियाज खान, ममता मुंदडा, राजश्री गौरकार, वंदना हातगावकर यांच्यासह इतरांची
मंचावर उपस्थिती होती.

आमदार जोरगेवार यांच्या वतीने श्री माता महाकाली महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यात विशेष महिलांसाठी 17 जुन्या पारंपारिक खेळांचे आयोजन आझाद बागेत घेण्यात आले.

यात मामाच पत्र हरपल, लगोरी, लिंबु चम्मच, संगीत खुर्ची, रस्सा खेच, लंगडी, पिंकी पिंकी व्हाट कलर, साखळी खेळ, फुगडी, बेडुक उडी, तीन पायाची लंगडी, टोपी संगीत खेळ, पोता उडी, बटाटा रेस, तळ्यात – मळ्यात, चिकट मासा आदीं खेळांचा समावेश करण्यात आला होता.

आमदार जोरगेवार यांच्या संकल्पनेतुन आयोजित या खेळांना तरुणी व महिलांंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तिन हजार महिलांनी खेळात सहभाग घेत हरविलेल्या जुण्या खेळांचा मनमुराद आनंद घेतला. महिला संसार सांभाळत असतांना स्वतासाठी जगत नाही. त्यामुळे एक दिवस त्यांनी स्वतःसाठी जगत बालपणीच्या आनंददायी आठवणीत जगावे, त्यांचे धाडस वाढावे या हेतुने आपण “चला आठवणीच्या गावात “ही संकल्पना सुरु केली आहे. यात महिलांचा उत्तम प्रसिसाद मिळाला आहे. दरवर्षी आता या खेळांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे आमदार जोरगेवार म्हणाले. सदरहु स्पर्धांमध्ये आमदार जोरगेवार यांच्या पत्नी कल्याणी किशोर जोरगेवार यांनीही सहभाग घेतला होता. स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते आकर्षित पुरस्कार देत त्यांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्र – संचालन सरोज चांदेकर, प्रज्ञा जीवनकर यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी यंग चांदा ब्रिगेडच्या महिला आघाडीने अथक परिश्रम घेतले.