Home Breaking News rajura taluka@ news चार्लीतील अवैध दारु विक्री बंद करा हो !...

rajura taluka@ news चार्लीतील अवैध दारु विक्री बंद करा हो ! शेकडों महिलांची एकमुखी मागणी!

281

rajura taluka@ news

चार्लीतील अवैध दारु विक्री बंद करा हो !

शेकडों महिलांची एकमुखी मागणी!

सवर्ण भारत:किरण घाटे

चंद्रपूर:एक हजार लोकसंख्या असलेल्या चार्ली गावात गेल्या काही दिवसांपासून अवैध दारुची विक्री होत असून गावातील तरुण मुले दारुच्या आहारी गेली आहे.तदवतंच गावात भांडण तंट्यांचे प्रमाण वाढले आहे.या अवैध दारु विक्रीला कोणाचा आशिर्वाद आहे असा सवाल करीत काल सोमवार दि.२७फेब्रु़वारीला राजूरा तालुक्यातील चार्ली येथील शेंकडों महिला , तरुणीं व पुरुषांनी चंद्रपूर गाठून या गावातील ही अवैध दारु विक्री त्वरित कायमची बंद करावी अश्या आशयाची मागणी करीत चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा व पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांना एक लेखी निवेदन सादर केले आहेत.या पूर्वी सुद्धा गावकऱ्यांनी गावातील दारुबंदी व्हावी म्हणून पोलिस प्रशासनाकडे निवेदने सादर केली आहे.परंतू त्या निवेदनाची योग्य दखल न घेतल्यामुळे दिवसांगणिक गावात दारु विक्रीचे प्रमाण झपाट्याने वाढले. सदरहु अवैध दारु विक्री मुळे आता महिला व तरुणींना अधिक त्रास होवू लागला आहे.

सोबतच गावातील शांतता धोक्यात आली आहे.चार्लीतील अवैध दारुबंदी करण्यासाठी ग्रामपंचायतने एक ठराव देखिल घेतला आहे.व निवेदनासोबत त्याच्या छायांकित प्रति देखिल अधिकारी वर्गांकडे पाठवल्या आहे! एव्हढं सारे होवून देखिल या गावातील दारुबंदी होत नाही किंवा अवैध दारु विक्रेत्यावर कारवाई होत नाही याचे आश्चर्य वाटते.

चंद्रपूर पोलिस अधिक्षकांनी आपल्या स्तरावरुन या बाबतीत कारवाई करावी अशी मागणी चार्लीचे सरपंच सुरेन्द्र आवारी ,कल्पना माहुरे ,तेजस्वीनी गौरकार यांचेसह शेंकडों महिलांनी काल एका निवेदनातून केली आहे.