Home Breaking News Bhadravati city@ news टायगर ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. तान्हाजी जाधव यांची...

Bhadravati city@ news टायगर ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. तान्हाजी जाधव यांची भद्रावती शहराला सदिच्छा भेट.

123

Bhadravati city@ news

टायगर ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. तान्हाजी जाधव यांची भद्रावती शहराला सदिच्छा भेट.

सुवर्ण भारत: ग्यानिवत गेडाम

सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

भद्रावती:नव्या पिढीमधे स्त:च्या स्वाथ्याबद्दल जागरुकता निर्माण व्हावी व ते व्यसनापासून दुर रहावे हा संदेश घेऊन टायगर ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा सामाजीक कार्यकर्ते डॉ. तान्हाजी जाधव यांनी विदर्भ दौरा केला यादरम्यान त्यांनी भद्रावती शहराला भेट दिली.यावेळी त्यांनी चिन,पाकीस्तान व कारगील युद्धात लढलेल्या जिल्ह्यातील एकमेव असलेले 92वर्षीय सैनीक पांडूरंग हेमके यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केली व तिन्ही युध्दातील त्यांच्या आठवणी जाणुन घेतल्या.

पांडूरंग हेमके हे तिन युध्द लढलेले व हयात असलेले जिल्ह्यातील एकमेव सैनीक आहेत.यावेळी त्यांनी शहरातील प्रसिध्द व्यवसायीक तथा सामाजीक कार्यकर्ते किशोर हेमके याच्यासोबत शहरातील विवीध सामाजिक विषयांवर चर्चा केली.

या भेटीदरम्यान त्यांनी शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांना माल्यार्पण करुन शहरातील विवीध ऐतिहासीक स्थळांना भेटी दिल्या.यावेळी त्यांनी नव्या पिढींनी व्यसनापासून दुर राहुन आपले स्वास्थ्य ऊत्तम राखावे असे आवाहन केले.

या भेटीदरम्यान त्यांनी वरोरा येथे टायगर ग्रुपच्या सदस्यांशी तथा युवकांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत सोनू वाटमारे,बाळासाहेब जाधव, उमेश पोखरकर,किशोर हेमके,प्रमोद नागोसे,अभी हेमके,सुरज गावंडे,माजी सैनीक मनोज ठेंगणे,अक्षय हेमके,तन्विर शेख आदी मान्यवर उपस्थित होते.