Home Breaking News Nagpur dist @news राजेश मामुलकर व उमेश बाणाईत यांचा प्रामाणिकपणा…!

Nagpur dist @news राजेश मामुलकर व उमेश बाणाईत यांचा प्रामाणिकपणा…!

124

Nagpur dist @news

■ राजेश मामुलकर व उमेश बाणाईत यांचा प्रामाणिकपणा…!

सुवर्ण भारत:किरण घाटे(सहसंपादक)

नागपुर:शीलं परम् भूषणम्।’ असे म्हणतात. सद्वर्तन हाच सर्वांत मोठा अलंकार ! प्रामाणिकपणा हा सद्वर्तनातील सर्वांत मोठा गुण आहे. माणूस प्रामाणिक असला, तर त्याच्या हातून वाईट गोष्टी घडतच नाहीत. प्रामाणिक राहणे हे फारच अवघड असते. त्यासाठी फार मोठे धाडस लागते. पुष्कळ वेळा आपण प्रामाणिकपणाने वागलो, तर आपले नुकसान होऊ शकते, अशी स्थिती असते. पण ते नुकसान स्विकारण्याची आपली तयारी हवी. तेवढे धैर्य आपल्याजवळ असले पाहिजे.असे धाडस व प्रामाणिकपणा फारच कमी लोकांमध्ये बघायला मिळतो.

नागपूर सिटी बस चालक राजेश मामुलकर व वाहक उमेश बनाईत हे त्यापैकी एक!या दोघांनी आपला प्रामाणिकपणा कायम राखत सिटी बसने प्रवास करीत असलेल्या एका प्रध्यापिकेची बॅग त्यांना परत केली.

महाराष्ट्रातील नामवंत सहजं सुचलं व्हाॅट्सअप गृपच्या सदस्य प्रा. डॉ. वैशाली गणेश भांडारकर ह्या शीतलमाता मंदिर भांडेवाडी येथून M H31CP 7820 या VAN ने प्रवास करीत असतांना vanchalk सोनू बावनगडे यांनी अजाणतेपणे महिला कला महाविद्यालय उमरेडच्या प्रा.भांडारकर यांची बॅग गोरक्षण विहीरगाव या ठिकाणी ठेवून दिली. हा प्रकार सिटी बसचालक राजेश बाणाईत व वाहन चालक उमेश बाणाईत (बस क्रमांक M,H31C A773 खापरी नाका डेपो ट्रॅव्हल साईन ) यांना रोडवर असल्याचे आढळून आले.

त्यांनी ती बॅग उचलून बॅग मधे असलेल्या महत्वाच्या कागदपत्रावरून त्यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लखपती गायकवाड यांच्याशी संपर्क साधला व सदरहु प्राध्यापिकेचा दूरध्वनी क्रमांक मिळविला काही वेळातच ती बॅग त्यांच्या सुपूर्द केली. हरविलेली बॅग मिळताच गणेश भांडारकर व वैशाली भांडारकर या शिवाय महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी राजेश मामूलकर व उमेश बाणाईत यांच्या प्रामाणिक पणाचे कौतुक केले.अजून ही या जगात काही प्रामाणिक लोक आहे याचा प्रत्यक्ष प्रत्यय प्रा. वैशाली भांडारकर यांना आला .