Chandrapur city@news
■ मुन्ना तावाडेंना उत्कृष्ट डिजिटल मीडिया पत्रकाराचा पुरस्कार घोषित!
सुवर्ण भारत:किरण घाटे(सहसंपादक)
चंद्रपुर:माहिती अधिकार पोलिस मित्र व पत्रकार संरक्षण सेना इंडिया २४ न्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा उत्कृष्ट डिजिटल मीडिया पत्रकार पुरस्कार इंडिया दस्तक न्युज टीव्हीचे संस्थापक व संपादक मुन्ना तावाडे यांना नुकताच जाहीर करण्यात आला आहे.
तावाडे यांना उत्कृष्ट डिजिटल मीडिया पत्रकार पुरस्कार माहिती अधिकार पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेना इंडिया २४ न्यूज यांच्या वर्धापन दिन व महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार सत्कार सोहळ्याच्या प्रसंगी देऊन गौरविण्यात येणार असल्याचे आयोजकांनी कळविले आहे. सदरहु कार्यक्रम चंद्रपूर येथील कर्मवीर दादासाहेब मा.सा.कन्नमवार सभागृहात दि. ५ मार्च २०२३ ला आयोजीत करण्यात आला आहे.
तावाडे हे सध्या पुरोगामी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष असून या शिवाय ते समाज समता संघाचे जिल्हाध्यक्ष म्हणून सामाजिक उपक्रमात सदैव सक्रिय राहात असतात. गेल्या अनेक वर्षापासून मुन्ना तावाडे हे पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून आपल्या पत्रकारितेतून त्यांनी वंचितांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम केले आहे.त्यांना उत्कृष्ट डिजिटल मीडिया पत्रकार पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन केल्या जात आहे.
