Wardha dist @news
■ पुलई येथे समता सैनिक दलाची कार्यकारिणी गठीत व शाखा फलकाचे अनावरण..!
सुवर्ण भारत:अर्पित वाहाणे
उपजिल्हा प्रतिनिधी, वर्धा
पुलई:वर्धा तालुक्यातील रमाई बुद्ध विहार पुलई येथील विहारात गाव तेथे शाखा, घर तेथे सैनिक व विहार तेथे वाचनालय या अभियानांतर्गत ग्राम शाखा स्थापन करण्यासंदर्भात समता सैनिक दलाची सभा पार पडली.
या सभेच्या अध्यक्षस्थानी समता सैनिक दल वर्धा तालुका संघटक मार्शल मनोज थुल हे प्रामुख्याने उपस्थित होते.तर प्रमुख अतिथी म्हणून वर्धा जिल्हा संघटिका महिला विंग मार्शल प्रीती आष्टेकर,जिल्हा कोषप्रमुख महिला विंग मार्शल वंदना वासनिक,मार्शल प्रदीप कांबळे, वर्धा तालुका कोषप्रमुख मार्शल दिगंबर लांबे, मार्शल आकाश कांबळे तालुका सहसंघटक, मार्शल धर्मपाल तेलंग , हे उपस्थित होते.
सुरुवातीला भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला सेलूटेशन देण्यात आले व त्यानंतर बुद्ध वंदना घेण्यात आली.
यावेळी समता सैनिक दल वर्धा तालुका संघटक मनोज थुल यांनी कार्यकारिणीचे कार्य व समता सैनिक दलाची गरज याबाबत माहिती देऊन समता सैनिक दल पुलई ग्राम शाखेची कार्यकारिणी गठीत करण्यात आली.त्यानंतर तालुका संघटक मनोज थुल व दिगंबर लांबे यांच्या हस्ते फलकाचे अनावरण करण्यात आले.
ग्राम शाखा संघटकपदी मार्शल कुणाल निकोसे,सह-संघटकदी मार्शल अमित बडगे,तर शाखा निमंत्रक म्हणून मार्शल रितिक सुखदेवे,शाखा-प्रचारक मार्शल अमन मेश्राम,शाखा कोषप्रमुख साहिल ढोके,सुरक्षा प्रमुख मार्शल मनीष धोके,शाखा प्रशिक्षक अनिकेत पाटील,तर संकेत ढोके सहबौध्दिक प्रमुखयांची निवड करण्यात आली.
सदस्य म्हणून मार्शल आदित्य मेसराम,आदित्य लिंतपणे,हर्षदीप मेसराम,सुजल खोब्रागडे,यांची निवड करण्यात आली.
कार्यक्रमाचे सुत्र संचालन चंद्रकला मेश्राम यांनी केले तर उपस्थितांचे आभार सुजाता भीमटे यांनी मानले.कार्यक्रमाचा शेवट समापन गाथेने करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाला शीतल खोब्रागडे, अर्चना मेश्राम, मिनाक्षी खोब्रागडे, अंकिता ढोके, छाया तिरपुडे,कीर्ती मेश्राम, राधा खोब्रागडे, नंदा बडगे,तसेच पदाधिकारी ,कार्यकर्ते व गावातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
