Home Breaking News Ballarpur taluka@news ■ वंचित बहुजन आघाडी कोठारी अध्यक्ष पदी सचिन रायपुर...

Ballarpur taluka@news ■ वंचित बहुजन आघाडी कोठारी अध्यक्ष पदी सचिन रायपुर यांची नियुक्ति

208

Ballarpur taluka@news

■ वंचित बहुजन आघाडी कोठारी अध्यक्ष पदी सचिन रायपुर यांची नियुक्ति

सुवर्ण भारत:ग्यानिवंत गेडाम
सहजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपुर

बल्लारपुर(कोठारी):बल्लारपुर तालुक्यातील कोठारी येथे वंचित बहुजन आघाडी बल्लारपूर तालुका अध्यक्ष उमेश वाढई ,तालुका सदस्य संदिप निरांजने यांच्या उपस्थित बैठक घेण्यात आले. आगामी काळात येत असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका संपूर्ण ताकतिनी लढायचा असून त्या संदर्भात मोर्चे बांधणी करण्याचा सूचना पदाधिकारी यांना देण्यात आल्या.

त्याच बरोबर कोठारी शाखेची नव्याने कार्यकारणी गठित करण्यात आली असून शाखा अध्यक्ष म्हणून सचिन रायपूरे यांची निवड करण्यात आलेली आहे. तसेच उपाध्यक्ष पदी सचिन गेडाम, अशोक मोरे, महासचिव पदी राहुल देठे, राहुल रामटेके , सचिव पदी अमोल कातकर, संघटक पदी नितीन रायपुरे, कोषाध्यक्ष सचिन रामटेके, मिडिया प्रमुख प्रफुल साखरकर यांची निवड करण्यात आलेली आहे. सदर बैठक बल्लारपूर तालुका अध्यक्ष उमेश वाढई, तालुका सदस्य संदिप निरंजने व प्रमुख पाहुणे सिद्धार्थ शंभरकर , राजकुमार जूनघरे ,सचिन गेडाम,अमोल कातकर, अशोक मोरे, वसंता चांदेकर,नितीन रायपुरे यांचा उपस्थित पार पड़ली.