chandrapur city@ news
• विदर्भ किसान मजदूर कॉग्रेस वतीने शहीद बाबुराव शेडमाके जयंती दिनानिमित विनम्र आंदराजली वाहिली
सुवर्ण भारत: ग्यानिवांत गेडाम
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधि,चंद्रपूर
चंद्रपूर : भारतातील ब्रिटीश राजवटीच्या विरुध्द स्वांतत्र प्राप्ती साठी प्रखर लढा देणा-या क्रांतीवीर शहीद बाबूराव पुलेश्वर शेडमाके यांची जयंती अतिशय थाटात साजरी केल्या गेली.
माजी खासदार तथा काँग्रेस नेते नरेश पुगलिया यांच्या सुयोग्य मार्गदर्शनात युवा नेता राहूल पुगलिया यांच्या नेतृत्वात विदर्भ किसान मजदूर काँग्रेसचे गजाननराव गांवडे, शहारध्यक्ष तथा माजी नगरसेवक देवेंद्र बेले, जिल्हा महासचिव तथा माजी नगरसेवक अशोक नागापूरे, इंटकचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर पोडे, तसेच कार्यकर्तासह आज दिनांक १२ मार्च २०२३ रोजी चंद्रपूर येथील मध्यवर्ती कारागृह परिसरातील क्रांतीवीर शहीद बाबूराव पुलेश्वर शेडमाकेच्या पवित्र शहीद स्थानाला भेट देण्यात आली व त्यांच्या प्रतिमेला नेतृत्व करणा-या मान्यवरांच्या हस्ते मालार्पण करून आंदराजली अर्पण करण्यात आली.
याप्रंसगी कॉग्रेसचे विनोद पिंपळशेडे, रत्नमालाताई बावने, गजानन दिवसे, सुरेश बोडणे, सुरेश आंबेकर, अनंता हुड, सुनिल बावणे, पृथ्वी जंगम, हेंमत आक्केवार, प्रतिक लोडल्लीवार, व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
