Home Breaking News chandrapur dist@ news • 1 एप्रिलपासून शहरातील बँक ऑफ इंडिया शाखेच्या...

chandrapur dist@ news • 1 एप्रिलपासून शहरातील बँक ऑफ इंडिया शाखेच्या कामकाजाच्या वेळेत बदल..!

397

chandrapur dist@ news

• 1 एप्रिलपासून शहरातील बँक ऑफ इंडिया शाखेच्या कामकाजाच्या वेळेत बदल..!

सुवर्ण भारत : मंगेश टिकत
विशेष जिल्हा प्रतिनिधी,चंद्रपूर

चंद्रपूर : चंद्रपूर शहरात बँक ऑफ इंडियाच्या दोन शाखा कार्यरत आहे. यामध्ये बँक ऑफ इंडिया जटपुरा गेट शाखा (जिल्हा परिषद जवळ), आणि मुख्य शाखा (लक्ष्मीनारायण मंदिराजवळ) आहेत. सदर बँक शाखा 11 ते 6 या वेळेत कार्यरत असतात. परंतु, नव्या वेळापत्रकानुसार दोन्ही बँक शाखेचे कामकाज दि. 1 एप्रिल 2023 पासून सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत असणार आहे. यामध्ये 10 ते 4 वाजताच्या कालावधीत नागरीकांना बँकेचे आर्थिक व्यवहार करता येईल. तर बँकेचे अंतर्गत कामकाज सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू राहील.

बँक शाखेच्या उक्त कार्य अवधीत बदल करण्याकरीता सक्षम अधिकाऱ्यांकडून (जिल्हाधिकारी) जिल्हास्तरीय सल्लागार समितीमध्ये प्रस्तावास मान्यता देण्यात आली. तरी, दोन्ही शाखेच्या ग्राहकांनी याची नोंद घ्यावी व बँकेला सहकार्य करावे, असे जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रशांत धोंगडे यांनी कळविले आहे.