Home Breaking News chandrapur dist@ news • उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे लायसन्स कॅम्प आयोजित…!

chandrapur dist@ news • उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे लायसन्स कॅम्प आयोजित…!

291

chandrapur dist@ news
• उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे लायसन्स कॅम्प आयोजित…!

सुवर्ण भारत: ग्यानिवंत गेडाम
चंद्रपूर जिल्हा संपादक

चंद्रपूर:उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे जिल्ह्यांतर्गत लायसन्स कॅम्प आयोजित करण्यात येत आहे. सदर कॅम्पमध्ये शिकाऊ अनुज्ञप्ती व पक्के अनुज्ञप्ती पूर्वनियोजित ऑनलाइन अपॉइंटमेंट नुसार देण्यात येणार आहेत. तरी, जिल्ह्यातील नागरिकांनी उपलब्ध संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी केले आहे.

ही आहेत शिबिराची स्थळे:

दि. 23 मार्च 2023 रोजी आनंद निकेतन महाविद्यालय, आनंदवन वरोरा, 24 मार्च रोजी शासकीय विश्रामगृह, चिमूर, 27 मार्च रोजी एन.एच. महाविद्यालय ब्रह्मपुरी, 28 मार्च रोजी शासकीय विश्रामगृह, गोंडपिपरी तर 29 मार्च रोजी शरद पवार महाविद्यालय, गडचांदुर या ठिकाणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.