Home Breaking News chandrapur dist@ news • 20 मार्च रोजी महिला लोकशाही दिन..!

chandrapur dist@ news • 20 मार्च रोजी महिला लोकशाही दिन..!

235

chandrapur dist@ news
• 20 मार्च रोजी महिला लोकशाही दिन..!

सुवर्ण भारत: मंगेश तिखट
विशेष जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

चंद्रपूर: जिल्हास्तरावर प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी महिला लोकशाही दिन तर चौथ्या सोमवारी तालुकास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. माहे, मार्च महिन्याचा लोकशाही दिन 20 मार्च 2023 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या दालनात आयोजित करण्यात येत आहे.

या महिला लोकशाही दिनी न्यायप्रविष्ठ प्रकरणे, सेवाविषयक आस्थापने विषयक बाबी आणि विहीत अर्जात नसलेली प्रकरणे स्विकारण्यात येणार नाहीत. तरी, ज्या महिलांचे वरील बाबी सोडून तक्रार, निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे असतील अशा महिलांचे अर्ज प्रत्येक महिण्याच्या तिसऱ्या सोमवारच्या 15 दिवसापूर्वी विहित नमुण्यात असलेले अर्ज दोन प्रतीत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयात स्वीकारण्यात येईल. जेणेकरुन, जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनास तक्रार अर्जाचा निपटारा करण्यासाठी संबधित विभागाला सदर तक्रार अर्ज पाठविण्यात येईल. विहित अर्जाचा नमूना मिळविण्यासाठी कार्यालयास भेट द्यावी, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी कळविले आहे.