Home Breaking News सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना सुरू ठेवावी या मागणीस आप आदमी...

सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना सुरू ठेवावी या मागणीस आप आदमी पार्टीचा पाठिबा..!

339

ballarpur city@ news

•सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना सुरू ठेवावी या मागणीस आप आदमी पार्टीचा पाठिबा..!

सुवर्ण भारत: ग्यानिवंत गेडाम
संपादक चंद्रपूर जिल्हा

बल्लारपुर : सध्या सरकारी कर्मचारी जुनी पेन्शन योजना लागू ठेवावी यासाठी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. मंगळवार दिनांक १४ मार्च २०२३ पासून सरकारी कर्मचाऱ्यांचे संघटनानी आपल्या मागणीसाठी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाबमध्ये आम आदमी पक्ष सत्तेत येताच सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा ठराव मंजूर केला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सुद्धा पंजाब सरकारच्या या निर्णयाचे कौतुक केले होते.

२००५ नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना नवी राष्ट्रीय निवृत्तीवेतन पद्धती लागू करण्यात आलीय. या योजने अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या पगारातून कापलेली काही रक्कम शेअर बाजारात गुंतवली जाते. त्यामुळे निवृत्तीपश्चात मिळू शकणारा लाभ हा त्या त्या समयीच्या बाजारस्थितीनुरूप असेल. अर्थात शेअर बाजारातील सरकारी गुंतवणुकीची कशी वाट लागते याचा अनुभव देशाने अनेकदा घेतला आहे. या इतर अनेक कारणांमुळे शासकीय कर्मचाऱ्यांकडून नव्या पेन्शन योजनेला विरोध दिवसेंदिवस तीव्र होत आहे. जुन्या पेन्शन योजनेसाठी कर्मचारी ठिकठिकाणी आंदोलन करतायत. आम आदमी पार्टीचा बल्लारपूर शहरातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या या मागणीला पूर्ण पाठींबा देण्यात आला.