Home Breaking News Chandrapur dist@ news • महाराष्ट्र रत्न गौरव व हिरकणी पुरस्कारांच्या मानकरी...

Chandrapur dist@ news • महाराष्ट्र रत्न गौरव व हिरकणी पुरस्कारांच्या मानकरी ठरलेल्या कु .किरण साळवींवर होतोय अभिनंदनांचा वर्षाव !

182

Chandrapur dist@ news

• महाराष्ट्र रत्न गौरव व हिरकणी पुरस्कारांच्या मानकरी ठरलेल्या कु .किरण साळवींवर होतोय अभिनंदनांचा वर्षाव !

सुवर्ण भारत:किरण घाटे(सहसंपादक)

चंद्रपुर:चंद्रपूर जिल्ह्याच्या औद्योगिक भद्रावती नगरीतील उच्च शिक्षित सामाजिक महिला कार्यकर्त्या कु.किरण विजय साळवी यांना माहिती अधिकार, पोलिस मित्र, पत्रकार संरक्षण सेना व इंडिया 24 न्यूजचा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यात्म ,राजकीय व सामाजिक “महाराष्ट्र रत्न गौरव “(राज्यस्तरीय )पुरस्कार व आत्ताच एक्स्प्रेसचा त्यांना “हिरकणी “पुरस्कार मिळाल्याबद्दल महाराष्ट्रातील नामवंत सहजं सुचलं व्हाॅट्सअप गृपच्या मार्गदर्शिका मायाताई कोसरे ,अधिवक्ता मेघा धोटे, प्रभा अगडे ,सहज सुचलंच्या मुख्य संयोजिका रंज्जू मोडक, सहज सुचलंच्या सहसंयोजिका वर्षा कोंगरे , प्रतिभा पोहनकर , अंजूताई पिंपले , स्मिता बांडगे , नंदिनी लाहोळे , विद्या दारला ,विजया तत्वादी, सरोज हिवरे , सिमा पाटील , श्रूति उरणकर मुंबई , रोहीणी पराडकर, रजनी रणदिवे, मंथना नन्नावरे, मुग्धा खांडे , मेघा मिलमिले ,वर्षा आत्राम, चैताली आत्राम ,पुष्पा जुनघरे ,वर्षा उरकुडे , शिल्पा कांबळे, स्नेहा मडावी पुणे , कल्पना बनकर मुंबई यांनी कु. किरण साळवींचे अभिनंदन केले आहे.गेल्या काही वर्षांपासून भद्रावती नगरीत कु.किरण विजय साळवी यांची व्हॅर्चुअस मल्टीपर्पज ही संस्था कार्यरत असून त्या या संस्थेच्या संस्थापक व अध्यक्ष आहे .

उपरोक्त संस्थेत सहा महिला कर्मचारी कार्यरत आहेत.सदरहु संस्था ही दिव्यांगांसाठी काम करते . कु. साळवी यांचे शहरातील शैक्षणिक अध्यात्मिक, सांस्कृतिक ,साहित्य व सामाजिक सस्थेंशी आज पर्यंत अतिशय निकटचे संबंध राहिले आहे. कु.साळवी ह्या आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्ष म्हणून आपली जबाबदारी तेवढ्याच जबाबदारीने पार पाडीत आहे.त्यांचे विशेष , अतुलनिय व उल्लेखनीय कार्यामुळे त्यांना या पूर्वी देखील राज्यातील विविध संस्था व संघटनेच्या वतीने अनेक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. निस्वार्थी ,अभ्यासू व सामाजिक कार्यात सदैव अग्रस्थानी असलेल्या महिला कार्यकर्त्या कु‌.किरण साळवी यांना नुकतेच (याच महिन्यात )दोन पुरस्कार
मिळाल्याबद्दल अनेकांनी त्यांचे भ्रमनध्वनी व्हाॅट्सअप संदेशांच्या माध्यमातून व प्रत्यक्ष भेटून अभिनंदन केले आहे.