Home चंद्रपूर ballarpur @city news •सौ जयश्री मोहुर्ले यांचा उत्कृष्ट नगरसेविका म्हणून विशेष...

ballarpur @city news •सौ जयश्री मोहुर्ले यांचा उत्कृष्ट नगरसेविका म्हणून विशेष सत्कार..! • राणी अहिल्याबाई होळकर बहुद्देश्यीय संस्था तर्फे करण्यात आले सत्कार..!

395

ballarpur @city news

•सौ जयश्री मोहुर्ले यांचा उत्कृष्ट नगरसेविका म्हणून विशेष सत्कार..!

•राणी अहिल्याबाई होळकर बहुद्देश्यीय संस्था तर्फे करण्यात आले सत्कार..!

सुवर्ण भारत: पारिश मेश्राम
उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

बल्लारपुर:राणी अहिल्याबाई होळकर बहुउद्देशीय संस्था, बल्लारपूर तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमात सौ. जयश्री किशोर मोहुर्ले त्यांचा उत्कृष्ट नगरसेविका म्हणून विशेष सत्कार करण्यात आला. राजकारणात सामाजिक दायित्व जोपासत उल्लेखनीय कामगिर केल्याबद्दल गौरवार्थ सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यांनी गेल्या मागील पाच वर्षात वॉर्ड माझा,प्रयत्न माझा या उपक्रमा अंतर्गत तब्बल २४ कार्यक्रम घेतले. अंगणवाडीत पोषण आहारा मध्ये होणारा भोंगळ कारभार समोर आणून त्यांना धारेवर धरले. सोबतच अनेक असे निष्कृष्ट दर्जाचे कामांमध्ये त्यांनी विशेष दखल घेतली. त्यांनी कोरोना काळात जनतेच्या सेवेत धाऊन गेल्या सोबतच कोरोणा काळात रक्तदान शिबिर घेऊन माणुसकीच्या कर्तव्याची जाणीव करून दिली. अनेकांना मदतीचा हात दिला. जनतेचे कुठलेही काम असो, कुठली समस्या असो,त्यांनी सोडवण्याचा परिपूर्ण प्रयत्न करीत असतात. त्यांना आज त्यांच्या कार्याची पोच पावती म्हणून गौरविण्यात आले. तसेच पूजा मून,गायत्री रामटेके सामाजिक कार्यकर्त्या म्हणून यांचा ही सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाचे उद्घाटक सौ जयश्री किशोर मोहुर्ले अध्यक्ष डॉ.अभिलाषा गावतुरे, प्रमुख पाहुणे एडवोकेट मेघा भाले, किरण दुधे, भगत मॅडम, तुंबडे मॅडम यामशीनवार मॅडम मंचावर उपस्थीत होत्या.या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये डान्स,फॅशन शो,गीत गायन,वकृत्व स्पर्धा अशा पाच स्पर्धा घेण्यात आल्या.मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कार देण्यात आले.सदर कार्यक्रमाचे आयोजन राणी अहिल्याबाई होळकर बहुउद्देशीय संस्था, बल्लारपूर चे अध्यक्ष श्रीमती श्रुखला चौधरी, सचिव सौ कुंजीता सेंगर यांच्या पुढाकारातून घेण्यात आला.कार्यक्रमाचे नियोजनार्थ वैशाली साठे, वैशाली धाबरडे,पायल खडके,विना गजभिये, रंजना कापसे, स्वाती खडके,तारा निखाडे,पल्लवी थुलकर, जोशना खडके, यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रम स्केटिंग ग्राउंड बल्लारपूर येथे यशस्वीरित्या संपन्न झाला. कार्यक्रमाचे संचालन नयना कांबळे तर आभार प्रदर्शन नीता खडके यांनी केले.