Ghugus @city news
• नकोडा येथे आठवडी बाजार परिसरात आढळले मृत अवस्थेत हरणाचे पिल्लू .
सुवर्ण भारत:पंकज रामटेके
उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपुर
नकोडा: चंद्रपूर तालुक्यातील नकोडा येथे २३ मार्च रोजी आठवडी बाजारालगतच्या परिसरात हरणाच्या पिल्लाचे मृत शरीर पडलेले असल्याचे तेथील नागरिकांना दिसताच नागरिकांनी सदर घटनेची वार्ता माजी समाजकल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे यांना कळविली तेंव्हा पाझारे यांनी घटनास्थळी पोहोचून घटनेची पाहणी केली आणि वनविभाग तसेच पोलीसांना कळविले.
पोलीस विभागाची व वन विभागातील वन अधिकारी खाडे यांची टीम घटनास्थळी पोहोचून सदर घटनेचा पंचनाम केले व मृत हरणाच्या पिल्याला वनविभागाच्या टीमने आपल्या ताब्यात घेऊन पुढील तपासणीकरिता नेण्यात आले.
सदर हरणाचे पिल्लू जंगलातून नकोडा गावाच्या आठवडी बाजार परिसराला लागून असलेल्या वनविभागाच्या नर्सरीमध्ये चारा खाण्याकरिता आलेला असावा कदाचित चारा खाण्याच्या नादात आठवडी बाजाराच्या परिसराला असलेल्या तारेच्या कुंपणाला लटकून मृत पावल्याची शंका गावातील नागरिकांमध्ये वर्तवली जात आहे.
यावेळी घटनास्थळी गावातील सरपंच किरण बांदूरकर, माजी सरपंच, ऋषी कोवे, उपसरपंच मंगेश राजगडकर, ग्रा.पं सदस्य रजत तुरणकार, तसेच ,रमेश मेंढे,मधुकर नवले, नंदू पाटील, अविनाश दुबे, शैलेश फुलझेले व नितेश हस्ते गावातील नागरिकांची उपस्थिती होती.


