Home Breaking News ballarpur city @news • बल्हारपूरच्या महिला तहसीलदार स्नेहल रहाटेंनी आवळल्या रेती...

ballarpur city @news • बल्हारपूरच्या महिला तहसीलदार स्नेहल रहाटेंनी आवळल्या रेती तस्करांच्या मुसक्या..! • तीन वाहने केली दंडात्मक कारवाईसाठी तहसील कार्यालयात जमा..!

656

ballarpur city @news

• बल्हारपूरच्या महिला तहसीलदार स्नेहल रहाटेंनी आवळल्या रेती तस्करांच्या मुसक्या..!

• तीन वाहने केली दंडात्मक कारवाईसाठी तहसील कार्यालयात जमा..!

सुवर्ण भारत:किरण घाटे(सह संपादक)

चंद्रपूर:चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध रेती वाहनांवर दंडात्मक कारवाई तथा अंकुश लावण्यासाठी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना महसूल पथक तयार करण्याचे या पूर्वीच निर्देश दिले.त्या अनुषंगाने महसूल विभागाचे पथक तयार करण्यात आले आहे.

दरम्यान बल्हारपूरच्या महिला परि.उपजिल्हाधिकारी तथा तहसीलदार स्नेहल रहाटे यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी तीन अवैध रेती वाहनांवर दंडात्मक कारवाई केल्यानंतर आज गुरुवार दि.२३मार्चला दोन अवैध रेतींची वाहने वाहतूक करतांना पकडले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

तर काल बुधवारला बल्हारपूर तालुक्यात त्यांनी एका अवैध रेती ट्रॅक्टरला दंडात्मक कारवाईसाठी ताब्यात घेतले आहे .सध्या हे तिन्ही वाहने तहसील कार्यालयात जमा करण्यात आली आहे.
या कारवाईं मुळे बल्हारपूर तालुक्यातील रेती तस्करांत एकच खळबळ उडाली आहे. गेल्या तीन महिन्यांपूर्वी तहसीलदार स्नेहल रहाटे यांनी बल्हारपूर तालुक्याचा कार्यभार स्वीकारल्यानंतर शासकीय कामासोबतच त्यांनी गुप्त माहितीच्या आधारे अवैध रेतींची वाहने पकडण्यांवर अधिक लक्ष केंद्रींत केले असल्याचे एकंदरीत दिसून येते.