Home Breaking News Ballarpur @city news • राहुल गांधींची खासदारकी रद्द केल्याबद्दल..! ...

Ballarpur @city news • राहुल गांधींची खासदारकी रद्द केल्याबद्दल..! • काला दिवस म्हणून बल्लारपूर युवक कांग्रेस ने केले निषेध..!

473

Ballarpur @city news
• राहुल गांधींची खासदारकी रद्द केल्याबद्दल..!

• काला दिवस म्हणून बल्लारपूर युवक कांग्रेस ने केले निषेध..!

सुवर्ण भारत: ग्यानिवंत गेडाम
विशेष प्रतिनिधी

बल्लारपुर:मोदी आडनावाबद्दलच्या मानहानी प्रकरणात शिक्षा सुनवाया म्हणून पूर्व सासंद नरेश पुगलिया यांच्या मार्गदर्शनाथ व करण पुगलिया माजी जिल्हा, उपाध्यक्ष चेतन गेडाम प्रदेश सहसचिव युवक कांगेस यांच्या नेतृत्वात निषेध करण्यात आले.

गेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे? असा प्रश्न विचारत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. याप्रकरणी सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे.त्या नंतर आता राहुल गांधी यांचं संसद सदस्यत्व रद्द झाल्याची माहिती मिळाली असून, त्यांना खासदार म्हणून अपात्र ठरवण्यात आलं आहे.

लोकसभा सचिवालयानं ही मोठी कारवाई केली आहे.
केरळच्या वायनाडमधील काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना ‘मोदी आडनाव’ बद्दल टिपण्णी केल्यानंतर त्यांना दोषी ठरवून लोकसभा सदस्य म्हणून अपात्र ठरवण्यात आले आहे.त्यांनी संपूर्ण मोदी आडनावाबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. त्यामुळे न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले.

त्यांना उच्च न्यायालयात अपील करता यावे, यासाठी न्यायालयाने ३० दिवसांचा वेळ दिला असला तरी शिक्षेला स्थगिती दिलेली नाही. विशेष म्हणजे न्यायालयाने त्यांना जामीनही दिला आहे. राहुल गांधी यांनी २०१९ मध्ये केले होते वक्तव्य राहुल गांधी यांनी १३ एप्रिल २०१९ रोजी कर्नाटकातील कोलार येथे निवडणूक रॅलीत वादग्रस्त वक्तव्य केले होते.

काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले होते, “नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी यांचे आडनाव एकसारखेच का आहे? सगळ्या चोरांची आडनावं मोदी का असतात?.या विधानाबाबत भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनी राहुल यांच्यावर सुरत सत्र न्यायालयात फौजदारी मानहानीचा खटला दाखल केला होता. राहुल गांधी यांच्या समर्थनाथ बल्लारपुर नगर परिषद चौकत निषेध प्रदर्शन करण्यात आले

यावेळी काँग्रेसचे नेते देवेंद्र आर्या, नाना बुंदेल,भास्कर माकोड़े, विनोद आत्राम,जिल्हा महासचिव शंकर महाकाली,युवक कांग्रेस अध्यक्ष जुनैद सिद्दिकी, अध्यक्ष,एनएसयूआय अध्यक्ष दानिश शेख,अरविंद वर्मा,अजय रेड्डी,जिशान सिद्दिकी,प्रांजल बालपांडे,संजु सद्दाला,दीपक झिल्ला,रोहित खान,अक्षय आरेकर,प्रफुल्ल मुडेवार,अकरम शेख, अनिल चौहान, राज वर्मा, सतपाल सिंह, सचिन कौरासे,उपस्थित होते.