Home Breaking News ३७ % वीज दर वाढीच्या विरोधात बल्लारपुर आम आदमी पक्षाच्या आंदोलन

३७ % वीज दर वाढीच्या विरोधात बल्लारपुर आम आदमी पक्षाच्या आंदोलन

458

Ballarpur@ city news

• ३७ % वीज दर वाढीच्या विरोधात बल्लारपुर आम आदमी पक्षाच्या आंदोलन..!

सुवर्ण भारत : पारिश मेश्राम
उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

बल्लारपूर:२०१९ च्या निवडणुकीत शिवसेने ने आपल्या जाहिरातीत ३०० युनिट पर्यंत ३० % दर कमी करणार व २०० युनिट वीज मोफत देणार असल्याची घोषणा केली होती. एवढेच नव्हे तर मागच्या दोन वर्षांत देवेंद्र फडणवीस यांनी वीज दरवाढ व मोफत वीज देण्याबाबत अनेक वेळा रस्त्यावर येवून आंदोलन केली आहेत. परंतु आता त्यांचेच सरकार सत्तेवर असतांना मात्र जनतेला स्वस्त वीज देण्याऐवजी ३७ % वीज दर वाढविण्याचा शाॅक राज्यातील जनतेला मिळण्याची परिस्थिती आली आहे.

त्यामुळे या गंभीर मुद्याकडे शासनाने लक्ष देऊन वीज दरवाढ थांबवून दिल्ली व पंजाब प्रमाणे किमान २०० युनिट वीज मोफत द्यावी हि मागणी करत आम आदमी पक्ष बल्लारपुरचे शहराध्यक्ष रविकुमार पुप्पलवार यांच्या नेतृत्वात व जिल्हा संघठक प्रा. नागेश्वर गंडलेवार यांच्या मार्गदर्शनात आम आदमी पार्टी ,बल्लारपूर तर्फे शहरातील नगरपरिषद चौकात आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात बल्लारपुरचे शहरध्यक्ष रविकुमार पुप्पलवार, जिल्हा संघठक प्रा. नागेश्वर गंड़लेवार, उपाध्यक्ष गणेश सिलगमवार, कोषाध्यक्ष आसिफ हुसैन शेख, सचिव ज्योतिताई बाबरे, महिला उपाध्यक्ष सलमा सिद्दीकी, यूथ अध्यक्ष सागर कांबळे, संघटक अलीना शेख, सी.वाय.सी. सी प्रमुख शिरीन सिद्दीकी, सहप्रमुख आशीष गेड़ाम,सुधाकर गेड़ाम, रवीं नीमसटकर, बेबिताई बुरडकर, स्मिताताई लोहकरे, सचिन मत्ते, व कार्यकर्त्यांसह शहरातील अनेक नागरिकांनी सहभाग दर्शविला.