Home Breaking News chandrapur@ dist news •केंद्र सरकारचे धोरण दडपशाहीचे :माजी खासदार नरेश पुगलिया..!...

chandrapur@ dist news •केंद्र सरकारचे धोरण दडपशाहीचे :माजी खासदार नरेश पुगलिया..! •चंद्रपुरात सत्याग्रह आंदोलन करून राहुल गांधी यांना पाठिंबा..! •प्रियदर्शनी इंदिरा गांधी पुतळ्याजवळ धरणे आंदोलन..!

492

chandrapur@ dist news

•केंद्र सरकारचे धोरण दडपशाहीचे :माजी खासदार नरेश पुगलिया..!

•चंद्रपुरात सत्याग्रह आंदोलन करून राहुल गांधी यांना पाठिंबा..!

•प्रियदर्शनी इंदिरा गांधी पुतळ्याजवळ धरणे आंदोलन..!

सुवर्ण भारत:ग्यानिवंत गेडाम
उपजिल्हा प्रतिनिधी,चंद्रपूर

चंद्रपूर: काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या विरोधात आवाज उठवला आहे. मात्र त्यांचा आवाज बंद करण्याचे षडयंत्र केंद्र सरकार करत आहे. देशाचे संविधान वाचविण्यासाठी व लोकशाही जिवंत राहावी म्हणून ते संघर्ष करीत आहे. सामान्य जनतेचा विश्वासघात करण्याचे षडयंत्र केंद्र सरकार करत आहे. एका प्रकारे ही केंद्र सरकारची दडपशाही आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार नरेश पुगलिया यांनी केले.

चंद्रपूर येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी यांच्या पुतळ्याजळ विदर्भ किसान मजदुर काँग्रेसच्या वतीने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात केंद्रातील मोदी सरकारने अन्यायकारी धोरण अवलंबिले आहे. त्यांच्या सत्याग्रहाला पाठिंबा देण्यासाठी सोमवारी सकाळी ११ वाजतापासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना माजी खासदार नरेश पुगलिया बोलत होते.
यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गजानन गावंडे, युवा नेते राहुल पुगलिया, विजय मोगरे, अविनाश ठावरी, माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ पाटील टोंगे, वसंत मांढरे, नासीर खान, रामदास वागद्रकर, चंद्रकांत पोडे, देवेंद बेले, माजी उपसभापती अनेकश्वर मेश्राम, लोकशाहीर बाबुराव जुमनाके, दिनकर पाटील डाहूले, अनिल तुंगिडवार, विनोद आत्राम,शंकर महाकाली, जुनैद सिद्दीकी, अरविंद वर्मा,अजय रेड्डी यांच्यासह शेकडो कार्यक्रते उपस्थित होते.

माजी खासदार नरेश पुगलिया म्हणाले, राहुल गांधी यांनी देशभरात भारत जोडो यात्रा सुरू केली होती. या यात्रेनी सर्वसामान्य जनता जागृत झाली. यामुळे केंद्रातील मोदी सरकार भयभीत झाले. अर्थ संकल्प अधिवेशन दरम्यान संसदेत मोदी अडाणी यांचेवर प्रहार केला. ब्रिटन मधील भाषनाने देशाचा अपमान म्हणून संसदेचे कामकाज बंद केले. केवळ राहुल गांधी यांचा आवाज बंद करण्याचे षडयंत्र रचले गेले आहे. तकलादू भाषनाचा विपर्यास करून त्यांना संसदेतून बेदखल केले आहे.

ही केंद सरकारच्या माध्यमातून दडपशाही केली जात आहे. जनतेचा पैसा कुठे जात आहे. ही विचारना केल्यामुळे व केंद्र सरकारवर प्रहार केल्यामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी यांना नामोहरम करण्यासाठी केंद्र सरकारची प्रतिमा डागाळली आहे. याचे खापर सूडबुद्धीने विरोधी पक्षनेते यांचेवर फोडत आहे, असा प्रहार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नरेश पुगलिया यांनी केला.