Home Breaking News Rajura @taluka news • माजी आमदार वामनराव चटप यांचे हस्ते सेवानिवृत्त...

Rajura @taluka news • माजी आमदार वामनराव चटप यांचे हस्ते सेवानिवृत्त मंडळ अधिकारी राजेंद्र पचारेंचा सत्कार..! • अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती !

437

Rajura @taluka news

• माजी आमदार वामनराव चटप यांचे हस्ते सेवानिवृत्त मंडळ अधिकारी राजेंद्र पचारेंचा सत्कार..!

• अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती !

सुवर्ण भारत:किरण घाटे (उपसंपादक)

राजुरा:राजूरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार , विदर्भातील शेतकरी संघटनेचे नेते तथा वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी सातत्याने लढा देणारे वामनराव चटप यांनी आज रविवार दि.२एफ्रिलला सकाळी १० वाजता राजेंद्र पचारे यांचे राजूरा निवासस्थानी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह भेट दिली. वयोमानानुसार राजेंद्र पांडुरंग पचारे हे दि.३१ मार्चला शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले.शासकीय सेवेत असताना पचारे यांनी सर्वांशी आपुलकीचे, जिव्हाळ्याचे व प्रेमाचे संबंध ठेवले होते.

दरम्यान सेवानिवृत्ती निमित्त आज रविवारी सकाळी राजेंद्र पचारे व त्यांच्या अर्धांगिनी ज्योति पचारे यांचा माजी आमदार वामनराव चटप यांनी सत्कार करुन त्यांना भविष्यातील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या .या वेळी शेतकरी संघटनेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

शासकीय सेवेत असताना कोरपनाचे मंडळ अधिकारी राजेंद्र पचारे यांनी सर्व सामान्य जनतें सोबतच शेतकरी बांधवांचा विश्वास संपादन केला होता. कोरपना महसूल मंडळातील अनेक शेतकरी बांधवांचे प्रश्न सोडवत त्यांना योग्य दिला होता .असे माजी आमदार वामनराव चटप या वेळी बोलताना म्हणाले.
चटप यांचे सहकारी, मधू चिचोलकर,प्रभाकर ढवस,रमेश नळे ,दिलीप डेरकर,भाऊजी कनाके,बंडू देठे,कपिल ईदे यांनी देखील पचारे यांना शुभेच्छा व शुभकामना दिल्या . या छोट्याखाणी पार पडलेल्या सत्कार कार्यक्रमाला पचारे कुटुंबातील सर्व सदस्यगण उपस्थित होते.