Home Breaking News Ballarpur@ taluka news डॉ. किशोर चौरे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार...

Ballarpur@ taluka news डॉ. किशोर चौरे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार प्रदान सुवर्ण भारत:ताहिर शेख

75

Ballarpur@ taluka news
• डॉ. किशोर चौरे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

सुवर्ण भारत:ताहिर शेख
सहाय्यक जिल्हा, प्रतिनिधी चंद्रपूर

बल्लारपूर : दिनांक 26/03/2023 रोज रविवार ला नागपूर येथील विदर्भ हिन्दी साहित्य सम्मेलन सभागृहामध्ये प्रा.डॉ. किशोर चौरे इतिहास विभागप्रमुख, महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय बल्लारपूर जि. चंद्रपूर यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार 2023 देऊन सन्मानित करण्यात आले.
डॉ. किशोर चौरे यांच्या सामाजिक तथा शैक्षणिक कार्याची दखल घेऊन जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. दिपककुमार खोब्रागडे सर तथा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माझी अध्यक्ष मा. डॉ. श्रीपाल सबनीस सर पुणे व इतर मान्यवर यांच्या हस्ते जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाच्या नवव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून गौरव चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाला राज्य व देशभरातील साहित्यक, लेखक,कवी,संशोधकांना विभिन्न स्तरावरील पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.