Home Breaking News Ballarpur@ city news • डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी आपेक्षित विधान...

Ballarpur@ city news • डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी आपेक्षित विधान व अपमान करणाऱ्या आरोपीला अटक करण्याची मागणी :भिमआर्मी बल्लारपूर

300

Ballarpur@ city news

• डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी आपेक्षित विधान व अपमान करणाऱ्या आरोपीला अटक करण्याची मागणी :भिमआर्मी बल्लारपूर

सुवर्ण भारत: पारिश मेश्राम
उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

बल्लारपूर:चंद्रपूर जिल्ह्यातील तुकुम येथील रहिवासी गणेश ज्ञानेश्वर हिंगे या हरामखोराने फेसबुक व व्हाटसॲप च्या माध्यमातून समाजात तेड निर्माण होणार व जातीय दंगली घडवून येतील अशा प्रकारे विश्वरत्न, महामानव, क्रांतीसुर्य, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल अतिशय वादग्रस्त विधान वक्तव्य करुन संपूर्ण महाराष्ट्रातील आंबेडकर समाजाच्या भावाना दुखविल्या आहेत त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील आंबेडकर अनुयायी मध्ये आक्रमण व संतापाची लाट पसरलेली आहे . त्यामुळे या अतिशय गंभीर घटनेची दखल घेऊन भिम आर्मी बल्लारपूर व चंद्रपूर च्या भिम सैनिकांनी रामनगर पोलीस स्टेशन चंद्रपूर येथील पोलीस निरीक्षक राजेश मुळे यांना लेखी तक्रार निवेदन देऊन आरोपी गणेश ज्ञानेश्वर हिंगे यांच्या वर ताबडतोब योग्य प्रकारे व कायदेशीर ॲट्राॅसिटी ॲक्ट अंतर्गत व इतर भारतीय कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्या यावी अशी मागणी केली व लगेच आरोपी गणेश ज्ञानेश्वर हिंगे यांच्या वर कलम 295 ( A) नुसार रामनगर पोलीसांनी कारवाई करुन आरोपीला अटक करण्यात आले या वेळी निवेदन सादर करताना भिम आर्मी चंद्रपूर जिल्हाध्यक्ष सुरेन्द्र रायपूरे, भिम आर्मी बल्लारपूर शहर अध्यक्ष शशिकांत निराजंने, बबलू करमरकर, प्रदीप झामरे, परिश नगराळे, अमर धोंगडे , भारत थुलकर व इतर सर्व आंबेडकर अनुयायी व भिम सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.