Ballarpur@city news
•चंदनसिंह चंदेल यांच्या वाढदिवसाच्या निमित्य १२५ रक्तदात्यांनी रक्तदान केले
सुवर्ण भारत: पारिश मेश्राम
उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर
बल्लारपुर:गेल्या १५ वर्षांपासून राजकीय जीवनात सदैव सामाजिक कार्य करणारे महाराष्ट्र वन विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसिंह चंदेल यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान,उत्कृष्ट दान,रक्तदान जीवनदायी समिती बल्लारपूर मार्फत रक्तदान करण्यात आले ,त्याच निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
भाजपचे ज्येष्ठ नेते माजी वनविभाग अध्यक्ष चंदनसिंह चंदेल यांच्या वाढदिवसानिमित्त ०७ अप्रैल रोजी शगुन लान बल्लारपूर येथे भव्य रक्तदान व रक्तगट चाचणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.शहर भाजपा नेते व कार्यकर्ते,सामाजिक संस्था व शिबिरात नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.१२५ रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने समाजप्रबोधन केले. मोठा सहभाग होता. रक्तदान संस्था, बल्लारपूर यांच्या वतीने दर वर्षी सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.यावेळी रक्तदान समिति अध्यक्ष व भाजपा शहर अध्यक्ष बल्लारपुर काशीनाथ सिंग, भाजपा युवा मोर्चा शहर अध्यक्ष रणंजय सिंह, देवा वाटेकर अनेक कार्यकर्ते व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते


