Home Breaking News Ghugus city@ news • महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती काँग्रेस कार्यलयात...

Ghugus city@ news • महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती काँग्रेस कार्यलयात साजरी.

326

Ghugus city@ news

• महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती काँग्रेस कार्यलयात साजरी.

सुवर्ण भारत:पंकज रामटेके
उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपुर

घुग्घूस : लोकप्रिय नेते सामाजिक कार्यकर्ते विचारवंत समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त दिनांक ११ एप्रिल रोजी शहर काँग्रेस कार्यालयात काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस काँग्रेस नेते सुधाकर बांदूरकर व अलीम शेख यांच्या हस्ते माल्यार्पण करून आदरांजली अर्पित करण्यात आली.

एका स्त्रीचे शिक्षण हे अवघ्या कुटुंबाचे शिक्षण असल्याचे त्यांच्या लक्षात आले यामुळे त्यांनी भारतातील पहिली मुलीची शाळा पुण्यातील भिडे वाड्यात सुरू केली.

समाजाला शिक्षित केल्या शिवाय समाजातून जाती व्यवस्था किंवा भेदभाव मिटू शकणार नाही हे त्यांना कळाले होते म्हणून त्यांनी आपल्या पत्नी सावित्रीबाई फुले यांना शिकवून महिलांना शिकविण्यास प्रेरित केले.
त्यांनी आपला संपूर्ण आयुष्य शोषित वंचित घटकांच्या सेवेत खर्ची घातले.

अश्या या महामानवास काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी मानवंदना दिली याप्रसंगी काँग्रेस नेते सैय्यद अनवर,देव भंडारी,सुनील पाटील,रफिक शेख,साहिल सैय्यद,अंकुश सपाटे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते