Home Breaking News Ghugus city @news • इस्टर संडे निमित्त काँग्रेस तर्फे ज्युस वाटप.

Ghugus city @news • इस्टर संडे निमित्त काँग्रेस तर्फे ज्युस वाटप.

140

Ghugus city @news
• इस्टर संडे निमित्त काँग्रेस तर्फे ज्युस वाटप.

सुवर्ण भारत:पंकज रामटेके
उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

घुग्घूस : ईस्टर संडे प्रभू येशू मसीह यांच्या पुनरुत्थानाचा पवित्र दिवस ख्रिस्ती धर्माच्या मान्यतेनुसार या दिवशी येशू मृतातुन पुन्हा उठले होते.

नव्या करारानुसार गुड फ्रायडे दिनी येशू क्रूसावर मरण पावले
व तीन दिवसानंतर रविवारी पुन्हा जिवंत झाले या दिवशी चाळीस दिवसाच्या उपवासाचा काळ (लेंट) हा संपतो आजच्या पवित्र दिनी ख्रिस्ती समाज बांधवांच्या वतीने सि.एन.आय चर्च येथून धार्मिक मिरवणूक काढण्यात आली याप्रसंगी मोठ्या संख्येने समाज बांधव मिरवणुकीत उपस्थित झाले.

घुग्घूस शहर काँग्रेसच्या वतीने शहर अध्यक्ष राजुरेड्डी,रोशन दंतलवार,विशाल मादर यांच्या वतीने ज्युस वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला व मिरवणुकीत शामिल समाज बांधवांना ज्युस व थंड पाणी वितरीत करून सेवा कार्य केले.
याप्रसंगी काँग्रेस पदाधिकारी सुधाकर बांदूरकर,देव भंडारी, साहिल सैय्यद,सुनील पाटील,दिपक पेंदोर,अंकुश सपाटे,रंजित राखुंडे व अन्य पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले