Home Breaking News chandrapur dist @ news • वनमंत्र्यांच्या पुढाकारातून चंद्रपूर जिल्ह्यातील २४० दिव्यांगांना ताडोबा...

chandrapur dist @ news • वनमंत्र्यांच्या पुढाकारातून चंद्रपूर जिल्ह्यातील २४० दिव्यांगांना ताडोबा दर्शन.

311

chandrapur dist @ news
• वनमंत्र्यांच्या पुढाकारातून चंद्रपूर जिल्ह्यातील २४० दिव्यांगांना ताडोबा दर्शन.

सुवर्ण भारत: पंकज रामटेके
उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

चंद्रपूर : जगप्रसिध्‍द ताडोबा व्‍याघ्र प्रकल्प बघण्‍यासाठी देशविदेशातील पर्यटक येतात. ताडोबाचे प्राणी, वनवैभव व जैवविविधता जगप्रसिद्ध आहे. देशातील सर्वाधिक वाघ ताडोबा-अंधारी व्‍याघ्र प्रकल्‍पात आहे. त्‍यामुळे हमखास व्‍याघ्र दर्शनासाठी ताडोबा व्‍याघ्र प्रकल्‍पामध्‍ये पर्यटन केले जाते. याच पर्यटनाचा लाभ चंद्रपूर जिल्ह्यातील २४० दिव्यांग बांधवांनी घेतला.

ताडोबा व्‍याघ्र प्रकल्‍प बघता यावा, अशी इच्‍छा बल्लारपूर येथील विकलांग एकता शक्‍ती संघटनेच्या दिव्‍यांग बांधवांनी राज्‍याचे वन, सांस्‍कृतिक कार्य व मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचेकडे व्‍यक्‍त केली होती. वनमंत्र्यांनी याबाबत ताडोबा-अंधारीच्या अधिकाऱ्यांना सूचना करीत दिव्यांगांना ताडोबा सफर घडवावी असे सांगितले. त्यानुसार २ ते ७ एप्रिल २०२३ पर्यंत टप्याटप्याने चंद्रपूर जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांनी वन पर्यटनाचा लाभ घेतला. यावेळी दिव्यांगासोबत पालकांनी ताडोबा सफारी केली.

दिव्‍यांग बांधवांनी ताडोबातील पशू-पक्षी, विविध वृक्ष, विविध प्राणी, ताडोबातील जैवविविधतेचा मनसोक्‍त आनंद लुटला. ना. सुधीर मुनगंटीवार व वनविभागाच्‍या माध्‍यमातून हे पर्यटन दर्शन घडविण्‍यात आले. यावेळी दिव्‍यांग बांधवांना खाद्य किट्सचे वाटप करण्यात आले. वन मार्गदर्शकांनी ताडोबा व्‍याघ्र प्रकल्‍पाविषयी संपूर्ण माहिती देऊन ताडोबा पर्यटनाचे महत्‍व अधोरेखित केले. प्रकाश धारणे व वनाधिकारी यांच्‍या माध्‍यमातून ताडोबा व्‍याघ्र प्रकल्‍प दाखविण्‍यात आला. यावेळी दिव्‍यांग बांधवांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आभार व्यक्त केले. ताडोबा सफारीचा आनंद दिव्यांग बांधवाच्या चेहऱ्यावर छळकत होता.