Ghughus city@ news
• भगवान गौतम बौद्ध जयंती पंचशील बौद्ध विहार घुग्घुस येथे साजरी.
सुवर्ण भारत:पंकज रामटेके
सहजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर
घुग्घुस: भारतीय बौद्ध महसभा नगर शाखा घुग्घुसचा वतीने दि. 5 में 2023 रोजी तथागत भगवान गौतम बुद्ध जयंती पंचशील बौद्ध विहार समता वाचनालय घुग्घुस येथे साजरी करण्यात आली.
जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान बुद्ध यांची आज जयंती संपूर्ण विश्व साजरी करतात. तसेच भारतीय बौद्ध महसभा नगर शाखा घुग्घुस च्या वतीने सुध्दा पंचशील बौद्ध विहार समता वाचनालय घुग्घुस येथे भगवान गौतम बुद्ध यांची जयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे उद्घाटन आसिफराजा बी. शेख पोलीस निरीक्षक साहेब पो. स्टे. घुग्घुस तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश मल्हारी पाईकराव अध्यक्ष भारतीय बौद्ध महसभा नगर शाखा घुग्घुस कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक आयुनी कविता चांदेकर होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयुनी. रमाबाई गणपत सातारडे तर आभार प्रदर्शन जयंत निखाडे यांनी केले.
पंचशील बौद्ध विहाराचे नवनवीत बांधकाम सुरू असुन या विहाराच्या बांधकामाला कुठल्याही राजकीय क्षेत्रातील पैसा नवापरता फक्त लोक वर्गणीद्वारे हे विहार बांधकाम होत असुन या पावन पर्वावर मनोहरजी नगराळे यांनी विहाराला रेलिंग चे काम करण्यासाठी 65000/- पासष्टहजार रुपये देण्याचे ठरविले तसेच सुशांत सुधाकर जिवने यांनी आपल्या वडिलाचा वर्षाचा दिवस नकरता विहारास एक दरवाजाचा पल्ला दान दिला.
अध्यक्ष सुरेश मल्हारी पाईकराव यांनी यांचे धन्यवाद मानले आणि आव्हान केले कि या विहार बांधकामला जनतेनी दान देऊन हे वास्तु लवकरात लवकर बनविण्यासाठी आपले योगदान करावे तसेच कविताताई चांदेकर मॅडम,हेमंत पाझारे,अनिरुद्ध वनकर यानी आपले मनोगत व्यक्त केले.
तसेच पराग वानखेडे याचा 26 जानेवारी दिल्ली येथे परेड मध्ये निवड झाल्याबद्दल भगवान बुद्ध जयंती चे औचित्य साधुन त्यांचा भारतीय बौद्ध महसभा नगर शाखा घुग्घुस तर्फे या दिनी सत्कार करण्यात आला.
हेमंत आनंदराव पाझारे विहार बांधकाम कोषाध्यक्ष, कार्याध्यक्ष चंद्रगुप्त घागरगुंडे, उपाध्यक्ष शरद पाईकराव, उपाध्यक्ष मायाताई सांड्रावार, कोषाध्यक्ष वैशालीताई निखाडे, शितल कांबळे, सल्लागार संभाजी पाटील, दिगांबर बुरड, बापुरावजी कांबळे प्रविण कांबळे, आदी उपस्थित होते.




