Home Breaking News Ghughus city @news • नवनियुक्त महिला पदाधिकाऱ्यांचा घुग्घूस शहर काँग्रेस तर्फे...

Ghughus city @news • नवनियुक्त महिला पदाधिकाऱ्यांचा घुग्घूस शहर काँग्रेस तर्फे सत्कार

117

Ghughus city @news

• नवनियुक्त महिला पदाधिकाऱ्यांचा घुग्घूस शहर काँग्रेस तर्फे सत्कार

सुवर्ण भारत:पंकज रामटेके
सहजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

घुग्घूस : चंद्रपूर जिल्हा महिला काँग्रेसचे विस्तारित कार्यकारिणी महिला प्रदेश अध्यक्षा सौ. संध्याताई सव्वालाखे व महिला जिल्हाध्यक्ष सौ.नम्रता आचार्य ठेमस्कर यांच्या तर्फे घोषित करण्यात आली आहे.

घुग्घूस महिला काँग्रेस अध्यक्षपदी सौ. संगिता किशोर बोबडे यांची निवड करण्यात आली आहे. महिला जिल्हा काँग्रेस महासचिव पदी सौ.पदमा सदानंद त्रिवेणी यांची निवड करण्यात आली.

ग्रामीण काँग्रेस महिला जिल्हा उपाध्यक्षपदी सौ.यास्मिन अफसर सैय्यद, महिला जिल्हा सचिव पदी श्रीमती दुर्गा प्रदीप पाटील, तसेच सौ. मंगला बुरांडे यांची जिल्हा सचिव पदी निवड करण्यात आली सौ.दिप्ती सुजित सोनटक्के यांची अनुसूचित जाती विभाग महिला शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती.

सर्व नवनियुक्त महिला काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा शहर अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या वतीने घुग्घूस शहर काँग्रेस कार्यालयात छोटेखाणी कार्यक्रमात पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व नियुक्तीपत्र मिळताच भव्य स्वागत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे

या छोटेखानी कार्यक्रमात ज्येष्ठ नेते शामरावजी बोबडे, कामगार नेते सैय्यद अनवर,सुधाकर बांदूरकर,अनिरुद्ध आवळे,अलीम शेख,रोशन दंतलवार,विशाल मादर,नुरुल सिद्दीकी,देव भंडारी,अरविंद चहांदे,सुनील पाटील,अभिषेक सपडी, महिला कार्यकर्ते सौ.रेखा रेगुंडवार,सौ.कमीनाताई वैद्य,सौ.सुनंदाताई कामतवार,रंगारी ताई, सौ.शिल्पाताई गोयल,सौ.बेबीताई मारेकर, सौ. चंदाताई दुर्गे,सौ.उंदिरवाडे ताई,लक्ष्मीताई गोदारी,सौ.वृंदा कोंडे,गुजाबाई शेरकी,रामक्का गोल्ला,सखुबाई देशकर,गीता निखाडेव अन्य पदाधिकारी उपस्थित होते