Home Breaking News Ghugus city @news • बौद्ध बांधवांतर्फे भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांचा...

Ghugus city @news • बौद्ध बांधवांतर्फे भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांचा सत्कार.

92

Ghugus city @news

• बौद्ध बांधवांतर्फे भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांचा सत्कार.

सुवर्ण भारत:पंकज रामटेके
सहजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

घुग्घूस:घुग्घुस येथील तहसील कार्यालयासमोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक परिसरात सौन्दर्यीकरण, सुसज्ज सभागृह, स्वागत गेट असे विविध विकासकामे केल्याबद्दल आज बौद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून स्थानिक बौद्ध बांधवांतर्फे भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमावेळी, मान्यवरांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. प्रसंगीच जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी उपस्थितांना बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा ही दिल्या.

याचवेळी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात मंजूर झालेल्या हायमास्ट लाईटचे लोकार्पण ही करण्यात आले. त्यानंतर बुद्ध पौर्णिमेनिमित्त सामूहिक बुद्ध वंदना घेऊन स्मारक समितीतर्फे खीर वाटप कार्यक्रम पार पडला.

यावेळी मा.भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे,नवबौद्ध स्मारक तथा बहुउद्देशीय समिती अध्यक्ष रामचंद्र चंदनखेडे,कोषाध्यक्ष अशोक (बंडू) रामटेके, माजी सरपंच संतोष नुने, भाजपाचे विनोद चौधरी, कुसुम सातपुते, पूजा दुर्गम, सुचिता लुटे, समितीचे बबलू सातपुते, सुजित सोनटक्के, अनिरुद्ध आवळे, सिनू इसारप,शंकर सिद्दम,महेश लठ्ठा, राजेश मोरपाका, आकाश निब्रड, नागेश पथाडे, निरंजन डंभारे, सचिन कोंडावार, सुनीता पाटील, सुरेंद्र जोगी, श्रीकांत बहादूर,अतुल चोखाद्रे, आदिंसह मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.