Home Breaking News Chandrapur city@ news • फुटबॉल स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंचा यंग चांदा ब्रिगेडच्या...

Chandrapur city@ news • फुटबॉल स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंचा यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने सत्कार !

54

Chandrapur city@ news
• फुटबॉल स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंचा यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने सत्कार !

सुवर्ण भारत:किरण घाटे(सहसंपादक)

चंद्रपूर:धुळे येथे होणार असलेल्या अंडर १४ फुटबॉल स्पर्धेसाठी चंद्रपूर जिल्हा फुटबॉल संघाची निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या सर्व खेळाडूंचा यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने येथील स्थानिक कार्यालयात सत्कार करण्यात आला असुन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहे. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे जिल्हा महानगर अध्यक्ष पंकज गुप्ता, अल्पसंख्याक विभागाचे युथ शहर अध्यक्ष राशिद हुसेन, सायली येरणे यांच्यासह प्रशिक्षकांची उपस्थिती होती.
फुटबॉल खेळणारे खेळाडू आता मोठ्या प्रमाणात तयार होऊ लागले आहे. चंद्रपूरातही फुटबाॅल प्रेमींची संख्या लक्षणीय वाढत असुन फुटबॉल खेळाकडे युवकांचा कल वाढला आहे. आमदार किशोर जोरगेवार यांनी आयोजित केलेल्या माता महाकाली क्रिडा महोत्सवातही राज्यस्तरिय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चंद्रपूरच्या संघाने घवघवीत यश प्राप्त केले होते.
दरम्यान धुळे जिल्ह्यात आयोजित फुटबॉल स्पर्धेसाठी चंद्रपूर जिल्हा संघाची निवड करण्यात आली आहे. यात जिल्ह्यातील उत्तम खेडाळुंची निवड करण्यात आली आहे. उपरोक्त खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने त्या खेळाडूंच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यालयात आयोजित या सत्कार कार्यक्रमाला जिल्हा संघाचे सर्व खेडाळु व प्रशिक्षकांची उपस्थिती होती. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने सर्व खेडाळुंचे अभिनंदन करण्यात आले असुन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. सत्कार कार्यक्रमला यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.