Home Breaking News Chandrapur dist@ news • मेळाव्यात शेकडो लोकांनी घेतला दारू व्यसनमुक्तीचा संकल्प. ...

Chandrapur dist@ news • मेळाव्यात शेकडो लोकांनी घेतला दारू व्यसनमुक्तीचा संकल्प. • संतोष महाराज यांच्या उपस्थितीत व्यसनमुक्ती मेळावा संपन्न

255

Chandrapur dist@ news
• मेळाव्यात शेकडो लोकांनी घेतला दारू व्यसनमुक्तीचा संकल्प.

• संतोष महाराज यांच्या उपस्थितीत व्यसनमुक्ती मेळावा संपन्न

सुवर्ण भारत:किरण घाटे(सहसंपादक)

पोम्पूर्णा:श्री.शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटना तालुका पोभूर्णा जिल्हा चंद्रपूर च्या वतीने हनुमानजी ची मूर्ती
श्री शेषराव महाराज यांची मूर्ती स्थापना तसेच भव्य दारू व्यसनमुक्ती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे उद्घाटक
विनोद अहिरकर अध्यक्ष जनसेवा ग्रामीण विकास संस्था नांदगाव कार्यक्रमाचे अध्यक्ष भास्कर कुंदावर पोलीस उपनिरीक्षक बल्लारशा कार्यक्रमाचे सहउद्घाटक पंडितजी काळे जिल्हा कोषाध्यक्ष विशेष अतिथी म्हणून अनिल डोंगरे जिल्हाध्यक्ष प.पूज्य श्री.शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटना लक्ष्मीकांत धानोरकर जिल्हा उपाध्यक्ष दिगंबर वासेकर, जिल्हा संघटक भाऊराव ठाकरे, जिल्हाध्यक्ष गडचिरोली भालचंद्र रोहनकर जिल्हा प्रचारक प्रकाश अल्गमकर,संजय अहिरकर, मनोज आहीरकर,गजानन रामटेके सो.वनिताताई वाकुडकर सरपंच,शेखर व्याहाडकर सरपंच आशीच चिलमुल्वर,दिलीप म्याडावर शंकर वाकुडकर,जगदीश बांगरे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात प.पूज्य श्री.शेषराव महाराज यांच्या पालखीने गुरुवर्य प.पूज्य श्री.संतोष महाराज यांची रॅली दिंडी व हनुमानजी ची मूर्ती व प.पूज्यश्री.शेषराव महाराज यांची मूर्ती स्थापनेची पूजाअर्चा करून झाली. गुरुवर्य प.पूज्य श्री.संतोष महाराज यांनी आपल्या प्रवचन आणि संकल्पच्या माध्यमातून कार्यक्रमात उपस्थित असलेल्या शेकडो लोकांना दारू व्यसनमुक्तीचा संकल्प दिला.

संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल डोंगरे यांनी आपल्या मार्गदर्शनात संघटनेत मागील कार्यकाळात काही लोकांनी या कार्यात झोकून दिले असता ते लोक आज आमच्यात नाही. हे आमच्यासाठी व संघटनेसाठी दुःखाची बाब आहे. संघटनेचे पदाधिकारी हे शेतकरी शेतमजूर लोकांची मुलं असून त्यांना दारू व्यसनमुक्तीचे कार्य करताना कोणत्याही प्रकारची आमिष या पदाची अपेक्षा ठेवून काम न करता ते फक्त आणि फक्त या समाजात दारूच्या आहारी गेलेल्या लोकांना या वाईट व्यसनाच्या मार्गातून मुख्य प्रवर्गात कसे आणता येते व एक चांगला व्यक्ती व एक चांगला समाज कसा घडविता येते हेच त्यांचे प्रमुख आणि मुख्य उद्दिष्ट आहे असे त यावेळी बोलले. *
हनुमान मंदिर बांधकाम व प.पूज्य शेषराव महाराज मंदिर बांधकाम या बांधकामाकरिता लागणारे साहित्य पैसा या कार्याचे प्रथम योगदान नामदेव पाटील राऊत व त्यांची मौजा पिंपरी देशपांडे संघटना यांनी या कार्याला मोलाचं सहकार्य दिलं. तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील व पोंभूर्ना तालुक्यातील नवेगाव मोरे, दिघोरी,चेक फुटाणा,जुनगाव,चेक बल्लारपूर चेक आष्टा,कवठी व इतर संघटणा तसेच जिल्ह्यातील संघटनेचे पदाधिकाऱ्यांचे तसेच शिवभक्त लोकांचे मोलाचे योगदान सहकार्य मिळाले. या कार्यक्रमाला जिल्ह्यातून पुरुष,महिला वर्गातून हजारोंच्या संख्येने लोकांचे उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता मारुती वाकुलकर,साईनाथ कुनघाटकर,नामदेव राऊत, किरण नंदगिरीवार,ऋषिजी हेपट, दशरथ दिवशे, अनंता दिवशे, अशोक मांडवगडे, प्रकाश पूडके, नेरूमोरे लक्ष्मण नवघरे, मनोज भोयर, साईनाथ मोडघरे,गोपीनाथ बावणे, प्रदीप जवादे, नानाजी कुडमेते, प्रदीप थोरात, चपत शेरकी, प्रमोद गुरणुले, कपिल बुरांडे, संजय जगडकर, सुभाष पेंदोर,अनिल मांडवगडे,बंडू येलमुले. इत्यादी प.पूज्य श्री.शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटना तालुका पोभुर्णी च्या पदाधिकाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले.