Home Breaking News Chandrapur city@ news • विश्व विख्यात कुस्तीपटूंना न्याय द्या! • ब्रिजभुषण...

Chandrapur city@ news • विश्व विख्यात कुस्तीपटूंना न्याय द्या! • ब्रिजभुषण सिंगला अटक करा ! • या प्रमुख मागणीसाठी चंद्रपूरात माकपचे आंदोलन !

105

Chandrapur city@ news

• विश्व विख्यात कुस्तीपटूंना न्याय द्या!
• ब्रिजभुषण सिंगला अटक करा !
• या प्रमुख मागणीसाठी चंद्रपूरात माकपचे आंदोलन !

सुवर्ण भारत:किरण घाटे (सहसंपादक)

चंद्रपूर: एकशे चाळीस करोड जनतेचा सन्मान वाढविणारे कुस्तीपटू झालेल्या अत्याचाराच्या विरोधात न्याय मिळविण्यासाठी गेल्या एक महिन्यापासून दिल्ली येथे जंतर मंतरवर आंदोलन करीत आहेत . कुस्तीपटू संघाचे अध्यक्ष भाजपचे खासदार ब्रिजभुषण सिंग यांना अटक करा या मागणीला घेऊन होणा-या आंदोलनाला संपूर्ण देशातील जनतेचा विविध संघटनांचा पाठिंबा मिळत असून हजारोंच्या संख्येंने लोक या आंदोलनात सहभागी होत आहेत.तदवतंच या आंदोलनाला उत्स्फुर्तंपणे पाठिंबा देत आहे.मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, लालझेंडा कोलमाईन्स मजदूर युनियन, अखिल भारतीय जनवादी महिला संघटना व अंगणवाडी कर्मचारी संघटना यांच्या वतीने आज संध्याकाळी स्थानिक गांधी चौक येथे धरणा आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात मार्गदर्शन करताना प्रा.दहिवडे म्हणाले कि जागतिक स्पर्धेत प्राविण्य मिळवून खेळाडू देशात परतले तेव्हा याच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना घरी चहा नास्ता करीता बोलविले त्यांचे सोबत फोटो काढले .आज हेच खेळाडू झालेल्या विरोधात एक महिन्यांपासून रस्त्यावर उतरून न्याय मागत आहे.परंतू पंतप्रधानाजवळ आज वेळ नाही.काॅ.किशोर जामदार आपल्या भाषणात म्हणाले कि बेटी बचाव बेटी पढाओ हा नारा किती फोल होता हे आता जनतेला या निमित्ताने कळून चुकले आहे.कर्नाटकच्या निवडणूकांचा निकाल लागे पर्यंत ब्रिजभुषण सिंग यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला नाही.

आपले कोण काय बिघडू शकते याचं थाटात ते होते.पराभव होताच त्यांनी राजीनामा दिला.कर्नाटकाच्या निवडणूका जवळ येताच समाजात दुही निर्माण करण्यासाठी केरला स्टोरी नावाचा सिनेमा प्रसारित करण्यात आला.रामाचे नांव घेवून आता हे थकले आहेत.आता तर यांना बंजरंगबलीची आठवण झाली आहे.जम्मू काश्मीर मध्ये गेले तर निवडणूका जिंकण्यासाठी हे अल्ला हो अकबर देखील म्हणतील देवा व धर्मांशी काही देणे घेणे नाही असे जामदार पुढे म्हणाले.काॅ.अरुणोदय तसेच प्रमोद गोडघाटे यांनी ही या आंदोलन दरम्यान बोलताना भाजपाच्या सांप्रदायिक धोरणावर कडाडून हल्ला केला.आजचा धरणा कार्यक्रमात काॅ.रमन्ना ,राधा सुकरवार,शारदा लेनगुरे ,वर्षा तिजारे , राजेश पिंजरकर ,विद्या निब्रड , विनोद बुटले , गणपत कुडे , प्रमोद अर्जुनकर , विनोद मत्ते ,प्रमोद पानघाटे , धरमपाल सैलानी ,कैलाश रोडे प्रभाकर चुंचुवार यांचेसह शेकडों कार्यकर्त्यांनी भाग घेतला होता.या वेळी पोलिस विभागा तर्फे आंदोलन स्थळी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.