Home Breaking News Ballarpur city@ news • माजी नगरसेविका जयश्री मोहुर्ले केले ट्यूबवेलचे...

Ballarpur city@ news • माजी नगरसेविका जयश्री मोहुर्ले केले ट्यूबवेलचे भूमिपूजन • आमदार निधीतुन सांस्कृतिक सभागृह करिता टयूबवेल मजूरी

438

Ballarpur city@ news

• माजी नगरसेविका जयश्री मोहुर्ले केले ट्यूबवेलचे भूमिपूजन

• आमदार निधीतुन सांस्कृतिक सभागृह करिता टयूबवेल मजूरी

सुवर्ण भारत:परिश मेश्राम
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

बल्लारपुर: महाराणा प्रताप वॉर्ड मोठे हनुमान मंदिर जवळ येथे आमदार निधीतून निर्माणाधीन सांस्कृतिक सभागृह करिता ट्यूबवेल बोर मंजुर करून सदर कामाचे विधिवत भुमीपुजन चंदनसिंह चंदेल माजी अध्यक्ष वनविकास महामंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनात व बल्लारपूर नगर परिषद माजी नगराध्यक्ष हरीश शर्मा यांच्या नेतृत्वात माजी नगरसेविका सौ जयश्री मोहुर्ले व परिसरातील ज्येष्ठ नागरिक यांच्या हस्ते संपन्न झाले. सोबतच सभागृहनिर्माण करिता अडथळा निर्माण करणारी विद्युत लाईन व ट्रांसफार्मर संच याला स्थानांतरित करण्याकरिता लागणारा अतिरिक्त निधी आमदार सुधीर मुगंनटीवार यांनी तात्काळ मंजूर करून प्रश्न मार्गी लावला.

मागील अनेक दिवसांपासून परिसरातील नागरिकांची सभागृह करिता मोठी मागणी होती ज्याचा पाठपुरावा कर्तव्यदक्ष माजी नगरसेविका सौ जयश्री मोहुर्ले यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे करून निकाली काढला.

निर्मानाधीन सभागृहाकरिता अतिरिक्त लागणारा निधी याचा वाढीव प्रस्ताव शासनाकडे पाठवला असून तो लवकरात लवकर मंजूर होईल व अत्यंत शोभनीय सभागृह नागरिकांच्या सुविधेसाठी लवकरात लवकर उपलब्ध होईल असं आश्वासन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी माजी नगरसेविका सौ. जयश्रीताई मोहुर्ले यांच्या माध्यमातून नागरिकांना दिले.
सदर कार्यक्रमाचा पुढाकार सामाजिक कार्यकर्ता किशोर मोहुर्ले घेतला. या कार्यक्रमा प्रसंगी यशवंतराव बोंबले, कुर्मदास काळे, राकेश बुरडकर, जनार्दन काकडे, कुंजिता सेंगर,रंजीता कोत्तपल्लिवार, श सुनीता चौहान,शीतल ठाकूर,सीमा बोंबले,राजेश कोंनप्रत्तीवार,निलेश कटारे व आदी वॉर्डातील नागरिक उपस्थित होते.