Home Breaking News Chandrapur @ city news • यंग चांदा ब्रिगेड देतेय चंद्रपूरातील...

Chandrapur @ city news • यंग चांदा ब्रिगेड देतेय चंद्रपूरातील भिवापूर वार्डात नि:शुल्क ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण!

49

Chandrapur @ city news

• यंग चांदा ब्रिगेड देतेय चंद्रपूरातील भिवापूर वार्डात नि:शुल्क ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण!

सुवर्ण भारत: किरण घाटे (सहसंपादक)

चंद्रपूर:यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने भिवापूर वार्डातील तेली समाज मंदिर येथे नि:शुल्क ब्युटी पार्लर प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. महिला शहर संघटिका वंदना हातगांवकर यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे युवा नेते अमोल शेंडे, आशु फुलझेले, सायली येरणे, कल्पना शिंदे, आशा देशमुख, माधूरी निवलकर, यांच्यासह स्थानिक नागरिकांची उपस्थिती होती.

यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने महिला सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबविल्या जात आहे. तर अल्पसंख्याक विभागाच्या वतीने शहरातील विविध ठिकाणी नि:शुल्क शिवणकामाचे प्रशिक्षण दिल्या जात आहे. यात महिला मोठ्या संख्येने सहभागी होत असुन शिवणकामचे प्रशिक्षण घेत आहेत.

स्थानिक भिवापूर वार्ड येथे ब्युटी पार्लर प्रशिक्षणाचे आयोजन यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले आहे. सदरहु शिबिर हे एक महिना चालणार असून या शिबिरात हेअर स्टाईल, व्हॅक्स, मेनिक्युअर, पेडिक्युअर, हेड मसाज, शॅम्पू, मेहंदी डाय, फेशिअर, प्लकींग, साडीचे प्रकार, मेकअप, हेअर कटींग, पार्टी वेअर मेकअप आदीं प्रकारचे प्रशिक्षण महिलांना दिल्या जात असल्याचे आयोजकांनी कळविले आहे.