Home Breaking News Ballarpur city@ news • परीक्षा शुल्का विरोधात आम आदमी पक्षासह विद्यार्थ्यांचा आक्रोश

Ballarpur city@ news • परीक्षा शुल्का विरोधात आम आदमी पक्षासह विद्यार्थ्यांचा आक्रोश

282

Ballarpur city@ news
• परीक्षा शुल्का विरोधात आम आदमी पक्षासह विद्यार्थ्यांचा आक्रोश

सुवर्ण भारत:पारिश मेश्राम
उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

बल्लारपुर: 08/06/2023 शुक्रवार रोजी आम आदमी पार्टी बल्लारपुर शहराध्यक्ष रविकुमार पुप्पलवार यांच्या मार्गदर्शनाखाली यूथ सचिव तसेच स्टडीट्रॅक अकॅडमीचे स्पर्धा परिक्षा मार्गदर्शक रोहित जंगमवार यांच्या नेतृत्वात तहसीलदार डाॅ कांचन जगताप यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात आधीच बेरोजगारीने त्रस्त असलेल्या युवक- युवती जे दिर्घ कालावधी पासून नोकर भरतीची वाट बघत होते. नुकतेच पशुसंवर्धन भरती, राज्य उत्पादन शुल्क विभाग , वनरक्षक भरती सारख्या भरती जाहीर झालेल्या आहेत. परंतु ह्या भरतींमध्ये अमागास प्रवर्गास 1000 रूपये व मागास प्रवर्गास 900 रूपये शुल्क आकारले जात आहे. जे सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यां परवडणारे नाही.

2019 मध्ये जाहिरात निघालेल्या काही भरती परिक्षांच्या वारंवार तारखा घोषित होऊन परिक्षा रद्द झाल्या, त्या परिक्षांचे शुल्क अजुनही विद्यार्थ्यांना परत मिळाले नाही त्यामुळे ते शुल्क विद्यार्थ्यांना परत मिळावे व नवीन भरती परीक्षांमधील शुल्क 100 रू करावे अशी मागणी रोहित जंगमवार यांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांनी केली. तसेच सर्व राजनैतिक पक्ष व पत्रकार यांना आवाहन करण्यात आले की त्यांनी सुद्धा या मुद्द्यावर विद्यार्थ्यांना समर्थन द्यावे.

यावेळी शहराध्यक्ष रविकुमार पुप्पलवार, कोषाध्यक्ष आसिफ हुसैन शेख, सचिव ज्योतिताई बाबरे, यूथ अध्यक्ष सागर कांबळे, सचिव रोहित जंगमवार, महिला उपाध्यक्ष सलमा सिद्दीकी, संघठन मंत्री किरण खन्ना, सहसचिव शीतलताई झाडे, CYSS प्रमुख शिरीन सिद्दीकी, सहप्रमुख आशीष गेड़ाम, सुधाकर गेड़ाम, प्रो. प्रशांत वाळके, प्रो. तुषार डोंगरे, अफ़ज़ल अली, सौरभ चौहान, स्मिताताई लोहकरे, अनिल पाल, सागर पिंपळे , मनदिप सिंग, गुरूजीत सिंग, अंशुल, कपिल कावळे, तुषार वैद्य, तृषिता मानकर, अतुल मडावी, सुरज नैताम, भुवन देरकर, नीरज रामटेके, सुरज नट्टुर , फातिमा,श्रुती मेश्राम, मुस्कान, इशा, नैना, धनश्री इत्यादि कार्यकर्ते व सैकडो विद्यार्थी उपस्थित होते.